अधिस्वीकृती एक अभिशाप

पत्रकार मित्रानो, 

तुम्हाला आमदार,खासदार,पोलिस,तहसीलदार,बीडीओ,पंचायत समिती सदस्य,जी प सदस्य,गल्ली बोळातील कार्यकर्ते पत्रकार म्हणून ओळखत असतील.त्यांच्या लेखी तुम्ही चांगले पत्रकार असतालही पण शासन दरबारी तुम्ही कुणीही नाहीत हे लक्ष्यात घ्या.

समाज्यात मान मिळतोय,याच अप्रूपही आपल्याला वाटत असेल.पण याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतोय. याचा अनुभव पांडूरंग रायकर याच्यावर उपचार करायला संघर्ष करताना आला आहे.

तुमची आमची फक्त सामाजिक ओळख पत्रकाराची आहे. प्रसंगी आपली कार्यालय देखील आपण त्या संस्थेचा घटक आहोत हे नकारतात.ही बाब अत्यंत गम्भीर आहे. पण आम्ही त्यावर मन मोकळेपणाने बोलने,चर्चा करने पसंत करीत नाही. पण आता परिस्थिती बदलली आहे.तुमची शासन दरबारी नोंद ही गरजेची होवू लागली आहे. अर्थात ती आपल्या सारख्या ग्रामीण पत्रकरासाठी अशक्य गोष्ट आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे मुम्बई स्थित काही ठराविक पत्रकारानी यासाठीच्या अडचणी तयार केलेल्या आहेत.काही दिवसात या सर्व स्वार्थी पत्रकाराचा चेहरा समाजासमोर येणारच आहे. किंबहुना “अधिस्वीकृती” नावाचा भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडण्याच्या कामी तुम्हाला आम्हाला एकत्र येणे गरजेचे आहे.  याचा गैरअर्थ काढुन मूग गिळून बसण्यापेक्षा कोण पत्रकार आपल्या या कामात अडथळे आणत आहेत,कोणत्या संघटना यात खो घालत आहेत. यावर खुली चर्चा सुरू करा. सार काही ठीकान्यावर येईल. “अधिस्वीकृती” एक अभिशाप आहे. 

मालक व सरकारधार्जिने पत्रकारानी वाटोळे केले.

मुंबई सारख्या महानगरात बसुन वा मन्त्रिमंडळातील लोकाशी जवळीक साधून फक्त स्वता: चे हित साधणारे मतलबी पत्रकार हे ए सी त बसुन मालकधार्जिंण्या अटीशर्ती बनवतात की ज्यांचा ग्रामीण भागातील पत्रकारांवर त्यांच्या जीवनावर,अधिकारावर विपरीत परिणाम होतो. त्यांच जीवन किती अस्थिर होते.असुरक्षीत होते.याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन आपला स्वार्थ साधणारे शासन दरबारात मिरवतात आणि हे लोक ग्रामीण भागातील पत्रकारिता करणारासाठी नियम अटी बनवतात. आज पावतो कुणी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या भवितव्यासाठी लढा उभा केला आहे.

कुणीही सहज फायदा उठवतात 

ग्रामीण पत्रकारान्च्या जीवनला स्थर्य देण्यासाठी पुढे येईल त्यांच्यावर विश्वास ठेवू या. याबाबत मी अनेकवेळा बोलतं आलोय.दुर्दैवाने महानगरात एखाद्या सरकारमान्य “अधिस्वीकृती धारक” पत्रकारावर काही प्रसंग ओढावला की आम्ही ग्रामीण पत्रकार ज्यांची सरकार कडे पत्रकार म्हणून नोंदच नाही.असे निवेदन देत फिरतो. इथे आम्हाला आठवडाभर दोन वेळचा चहा पिता येणार नाही इतके मानधन दिले जाते त्यावर हे फिक्स पगारी सम्पादक कधी आवाज उठवीत नाहीत.हे तर उलट मालकाला आपल्या पेकेजसाठी आग्रही असतात. व ग्रामीण भागातील पत्रकाराकडून फुकट कसे काम करुन घेता येईल यासाठी आपली ” गोडबोली ” आयडिया अस्त्राचा वापर करुन या ग्रामीण भागातील वेठबिगार पत्रकाराना वापरुन घेतात. मोठ पेकेज घेवुन दुस-या संस्थेत या ग्रामीण पत्रकाराला वा-यावर सोड़ून निघुन जातात.
मी आगामी काळात हा सावळा गोंधळ मी न्यायालयात नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात या सर्व बहुरुपी मंडळींना उघडे पाडू हे नक्की… 

आज पुरते थांबतो.

माधव ओझा 

पत्रकार, पुणतांबा (शिरडी )

7 thoughts on “अधिस्वीकृती एक अभिशाप / black face of accreditation system.”
  1. वस्तुनिष्ठ लिहिले आहे आवाज उठवणे गरजेचे आहे माहिती जंनसंपॕक विभागावर पे़शर आणणे गरजेचे आहे

  2. आजची वस्तुस्थिती आहे परंतु याचे गांभीर्य व दुष्परीणाम किंबहुना अधिस्वीकृती म्हणजे नक्की काय हे सुद्धा काही ग्रामीण पत्रकारांना माहिती नाही हे दुर्दैव आहे….
    त्यावर कहर म्हणजे अनेक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी हे स्वतः देखील अधिस्वीकृतीधारक नाहीत.परंतु तरीदेखील ते शासन दरबारी सर्व पत्रकारांना समान संबोधले जाऊन त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा अशी आग्रही मागणी करताना दिसत नाहीत.
    शासनाकडे नोंदणी असलेल्या वृत्तवाहिनी व दैनिक वृत्तपत्रात अधिकृत वार्ताहर पासून संपादक पर्यंत कार्यरत असलेल्या प्रत्येक पत्रकारास अधिस्वीकृतीधारक संबोधले जावे असा कायदा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Leave a Reply to Reporter Sachin Nannaware Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *