अधिस्वीकृती एक अभिशाप
पत्रकार मित्रानो,
तुम्हाला आमदार,खासदार,पोलिस,तहसीलदार,बीडीओ,पंचायत समिती सदस्य,जी प सदस्य,गल्ली बोळातील कार्यकर्ते पत्रकार म्हणून ओळखत असतील.त्यांच्या लेखी तुम्ही चांगले पत्रकार असतालही पण शासन दरबारी तुम्ही कुणीही नाहीत हे लक्ष्यात घ्या.
समाज्यात मान मिळतोय,याच अप्रूपही आपल्याला वाटत असेल.पण याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतोय. याचा अनुभव पांडूरंग रायकर याच्यावर उपचार करायला संघर्ष करताना आला आहे.
तुमची आमची फक्त सामाजिक ओळख पत्रकाराची आहे. प्रसंगी आपली कार्यालय देखील आपण त्या संस्थेचा घटक आहोत हे नकारतात.ही बाब अत्यंत गम्भीर आहे. पण आम्ही त्यावर मन मोकळेपणाने बोलने,चर्चा करने पसंत करीत नाही. पण आता परिस्थिती बदलली आहे.तुमची शासन दरबारी नोंद ही गरजेची होवू लागली आहे. अर्थात ती आपल्या सारख्या ग्रामीण पत्रकरासाठी अशक्य गोष्ट आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे मुम्बई स्थित काही ठराविक पत्रकारानी यासाठीच्या अडचणी तयार केलेल्या आहेत.काही दिवसात या सर्व स्वार्थी पत्रकाराचा चेहरा समाजासमोर येणारच आहे. किंबहुना “अधिस्वीकृती” नावाचा भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडण्याच्या कामी तुम्हाला आम्हाला एकत्र येणे गरजेचे आहे. याचा गैरअर्थ काढुन मूग गिळून बसण्यापेक्षा कोण पत्रकार आपल्या या कामात अडथळे आणत आहेत,कोणत्या संघटना यात खो घालत आहेत. यावर खुली चर्चा सुरू करा. सार काही ठीकान्यावर येईल. “अधिस्वीकृती” एक अभिशाप आहे.
मालक व सरकारधार्जिने पत्रकारानी वाटोळे केले.
कुणीही सहज फायदा उठवतात
आज पुरते थांबतो.
माधव ओझा
पत्रकार, पुणतांबा (शिरडी )
वस्तुनिष्ठ लिहिले आहे आवाज उठवणे गरजेचे आहे माहिती जंनसंपॕक विभागावर पे़शर आणणे गरजेचे आहे
मनपूर्वक आभार, काही नवीन असल्यास सुचवा.
agreed
सहमत
आजची वस्तुस्थिती आहे परंतु याचे गांभीर्य व दुष्परीणाम किंबहुना अधिस्वीकृती म्हणजे नक्की काय हे सुद्धा काही ग्रामीण पत्रकारांना माहिती नाही हे दुर्दैव आहे….
त्यावर कहर म्हणजे अनेक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी हे स्वतः देखील अधिस्वीकृतीधारक नाहीत.परंतु तरीदेखील ते शासन दरबारी सर्व पत्रकारांना समान संबोधले जाऊन त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा अशी आग्रही मागणी करताना दिसत नाहीत.
शासनाकडे नोंदणी असलेल्या वृत्तवाहिनी व दैनिक वृत्तपत्रात अधिकृत वार्ताहर पासून संपादक पर्यंत कार्यरत असलेल्या प्रत्येक पत्रकारास अधिस्वीकृतीधारक संबोधले जावे असा कायदा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मनपूर्वक आभार, काही नवीन असल्यास सुचवा.
whoah this blog is magnificent i love reading your articles. Keep up the great work! You know, a lot of people are hunting around for this info, you could help them greatly.