निषेध असंवेदनशील मनमानीचा…. 

आजचा दिवस वर शनिवार दिनांक १० एप्रिल  २०२१ अत्यंत संतापाची सकाळ… बाहेर सरकारने लादलेली संचारबंदी. नागरिकांना भयभीत करण्यात कसर न सोडणारे प्रसार माध्यम .हि दिवसेंदिवस असंवेदनशील होत आहेत. बेजाबदार होत आहेत. त्यांना असे वागण्याशिवाय पर्याय नाही. कारण जरा सरकारच्या विरोधात वा वास्तव लिहायला दाखवायला सुरुवात केली कि सरकारचे बेअक्कल पाठीराखे पदरमोडून सरकारची वकिली करायला मोकळेच आहेत.आपण रस्त्यावर उतरून आपली बेजबाबदारी सिद्ध करू शकत नाही.मग हा एक मार्ग आहे,याच उद्द्येशाने सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा निषेध नोंदविण्याचा हा प्रयत्न आहे. मनात होत असलेली कोंडी सुटावी म्हणून व्यक्त होणे गरजेचे आहे ,आणि तणावातून मुक्त होणे. 

भय पसरवण्यात प्रसार माध्यम आघाडीवर  

दोन तीन दिवसापासून एकच मायना असलेल्या बातम्यांनी लोकांच्या मानसिकतेवर प्रचंड आघात केला आहे. ती म्हणजे एकाच सरणावर अनेकांचे अंत्यसंस्कार प्रशस्त अर्धपान व्यापणारी हि बातमी लोकांना भावनिक करणारी आहे. भय पसरवणारी आहे. याशिवाय पत्रकारितेची अक्कल गहाण ठेवल्याच हे जिवंत उदाहरण आहे. जवळपास सर्व ब्रँडेड वर्तमान पत्रांनी या बातमीला प्राधान्य दिले.जितक भय पसरवता येईल सामाज्याला  तितकं भयभीत करण्यात कुठलीच कसर या असंवेदनशील मंडळींनी बाकी ठेवली नाही. विशेष म्हणजे या संपूर्ण बातमीत प्रशासनाच्या या निर्दयतेने व भंपक नियमावर कुणीही आघात केला नाही वा त्याचा जाब जिल्हाधिकारी याना विचारला नाही. हि बाब पत्रकारितेच्या मरणासन्नतेच उदाहरण आहे.याचा निषेध .वास्तविक पाहता प्रत्येक गावात सरकारी ग्रामसेवक ,तलाठी ,आरोग्य कर्मचारी हे कार्यरत आहेत. मग काही तासांची प्रतीक्षा करून किंवा एकाच सरणावर अनेकांचे अंत्य संस्कार करून प्रशासनाला काय सिद्ध करायचे आहे.  

काय आहे वास्तव या एक सरणाच 

मध्यंतरी आमच्या न्यायालयांनी हिंदू सोडून अन्य सामाज्याला त्यांच्या सामाजिक प्रथेप्रमाणे कोरोनाबाधित मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार दिले.कदाचित त्यावेळी भारतातील विद्वान सनदी पगारी अधिकारी पुढे एका सरणावर अंत्यसंस्कार करून आपले कर्तव्य बजावण्याचे आदेश देऊन मयताचे कुटुंबियांना आजन्म पुरेल असा मानसिक आघात पोहचवतील याबाबत न्यायपालिकेला अंदाज आला नसावा.माझा या घटनेत सरकारला एक प्रश्न आहे.या आठवड्यात राज्यात एकाच सरणावर अनेकांचे अंत्यसंस्कार करण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत. त्यात पीडितांच्या धार्मिक प्रथा ,परंपरा कौटुंबिक भावना जपल्या गेल्या आहेत का ?केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडत आहोत ,समाजावर खुप उपकार करीत आहोत हि भावना समाजात रुजविण्यासाठी हा मार्ग अवलंबला असावा.   

प्रशासनाचे मौन सामाजाची दिशाभूल करणारे 

या घटनेवर प्रशासनाच्या वतीने कुठलही स्पष्टीकरण देण्यास कुणीही तयार नाही.विशेष म्हणजे एकत्र अंत्यसंस्कार केले गेले ते मयत संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावचे होते.त्यांचे अंत्यसंस्कार हे त्यांच्या गावी झाले असते तर एव्हढी संवेदनशील ,भावनिक ह्रदय हेलावणारी बातमी झाली नसती.भय पसरवणारी नसती. प्रशासनाला जाब विचारणारी यंत्रणाच बौद्धिक दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरु आहे. दुसरीकडे सत्तेचाळीस लाख लोकसंख्येच्या अहमदनगर जिल्ह्यात दिवसाला किती मृत्यू होऊ शकतात? अन जर हे सर्व अंत्यसंस्कार ज्याच्या त्याच्या गावी झाले असते तर 42 मयतावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार केल्यावर जो मानसिक आघात झाला तो झाला नसता. माझ्या सारख्याला हे लिहिण्याची वेळ आली नसती.समाजात भय पसरलं नसत.या सर्व मनमानीची न्यायालयीन चौकशी होऊन असा आदेश करून निर्णय घेणारांवर कार्यवाही व्हायला हवी आहे. 

सरकारी यंत्रणेने या सर्व प्रश्नांवर आत्मचिंतन करावे. 

कोरोना संकट येऊन वर्ष लोटलं तरीही आमच्या आरोग्य सुविधा लोकांचे जीव वाचविण्यास समृद्ध ,सिद्ध का ? झाल्या नाही. व जी चूक गत वर्षी केली तीच चूक याही वर्षी पुन्हा करीत आहे. सर्व रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी जमा करीत आहोत मग नवीन काय होणार आहे. दवाखाने भरलेले आहेत. मग कोविद सेंटर का सुरु नाही ? का लसीकरण अधिक गतिमानतेने केले जात नाहीय ? का खाजगी दवाखाने ,मेडिकल दुकाने हि सरकारच्या कायद्याचं सहजतेने उल्लंघन करीत लोकांची लूट करीत आहेत ? ठराविक लोकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दिले जातात,त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतला जात असेल तर एकाच सरणावर अनेकांचे अंत्यसंस्कार करावे हा आदेश काढलेला नसताना हि कृती का ? केली का असा निर्णय घेण्यात आला ? प्रशासनाला मनमानी करताना न्यायपालिकेची भीती वाटत नाही का ? 
https://ndtv.in/videos/last-rites-of-42-dead-bodies-in-ahmednagar-maharashtra-582062

हा कालचा फोटो सरकारी दवाखान्याचा आहे. 

लिहिण्याचे ,बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणून नव्हे तर समाजातील भय कमी व्हावं म्हणून हा खटाटोप आहे. सरकारी यंत्रणेने आत्मचिंतन करावे व जिथे प्रामाणिक कार्यवाहीची गरज आहे. ज्या कारवी सामाजिक जीवन हे विस्कळीत होणार नाही. सामाज मनावर विपरीत परिणाम करणारे ,मानसिक आघात पोहचविणारे चुकीचे ,मनमानीचे निर्णय घेण्याची मानसिकता बदलावी म्हणून हा लेख आहे.यात कुणाच्या भावनां दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही.  

 
0 thoughts on “निषेध असंवेदनशील मनमानीचा/unhuman act”
  1. 1. ज्याच्या त्याच्या गावी अंत्यसंस्कार केले जाईल किंवा करण्याची परवानगी दिली जावी याची काळजी घ्यावी.
    2. मध्यंतरी जंगली महाराज आश्रमातील एका साधूचे निधन झाले. त्या साधु महाराजांचे दफन करू न देता प्रशासनाने दहन करायला सांगितले. म्हणजेच ज्याच्या त्याच्या धर्मा प्रमाणे अंत्य संस्कार करण्यास परवानगी नाही

  2. कोर्टाचा आदेश आहे ,धार्मिक विधी करुन अंत्यविधी करण्यासाठीचा… अगदी अपवादाने म्हणजे ज्यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत नाहीत तेव्हा सरकारने हे कराव.

Leave a Reply to Vikas Shivgaje Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *