स्ट्रिंगर रिपोर्टर….
या शब्दाचा मुख्य अर्थ म्हणजे आपल्या घराला वा कुठल्याही बांधकामाला मजबुती येण्यासाठी या टोकाची त्या टोकाला धरून ठेवणारी तुळई म्हणजे ” स्ट्रिंगर ” दुसरा अर्थ कायम वेतन प्राप्त कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त वार्तांकन करणारा कामापुरता बातमीदार असा आहे.या शब्दाचा जन्म सुमारे १७०८ च्या दरम्यान झाला. १८८८ पासून या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला तो १९४८ पर्यंत तिथून पुढे तो दैनंदिन झाला.किती गमतीशीर आहे हा शब्द स्थापत्यात हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. तसाच भारतीय चौथ्या खांबाचा म्हणजेच एकूण पत्रकारितेचा कणा आहे हा “स्ट्रींगर” वास्तविक पाहता या व्यवसायात हा शब्द ” स्ट्रिंगर रिपोर्टर ” असा वापरला जातो अन्य देशात पण भारतात फक्त “स्ट्रिंगर ” हेच पत्रकारितेचे दुर्दैव आहे. या शब्दापुढे ” रिपोर्टर” लावावे लागते म्हणून बरीच मीडिया हाऊस ही आपल्या अंशकालीन बातमीदाराला ओळखपत्रही देत नाहीत.विदेशात या माध्यमातून पैसे कमावला जातो,एकवेळेला अनेक वृत्त संस्थेचे काम केले जाते.त्याचे कॉन्ट्रॅक्ट हे स्ट्रिंगरच्या बाजूने असतात. आपल्याकडे ते संस्थेच्या बाजूने या स्ट्रिंगरला ” वेठ बिगारी ” करायला लावणारे आहेत. गेल्या दशकात भारतात इलेकट्रोनिक मीडिया या स्ट्रिंगरच्या जोरावर देशातली सत्ता बदलू शकला.दुर्दैवाने हाच दुवा सरकारच्या दबावामुळे मोडीत निघाला. बेरोजगार झाला.सरकार बदलाचा पहिला फटका हा या “स्ट्रिंगर रिपोर्टरला ” बसला.
काय अवस्था आहे, स्ट्रिंगरशिपची आपल्या देशात
इलेकट्रोनिक मीडिया हाऊस या स्ट्रिंगरला एका बातमीचे पन्नास रुपया पासून ते एक हजार रुपया पर्यंत मानधन देते. ते वेगवेगळ्या मीडिया हाऊसच्या संपादकीय व मालकाच्या संगनमताने ठरते.मात्र हे मानधन काही ठरविक बोटावर मोजण्याइतकेच मीडिया हाऊस हे देतात.त्यात प्रामुख्याने एनडीटीव्ही,आजतक,ए बी पी ,न्युज १८,टी व्ही ९,न्यूज नेशन,झी मीडिया ही नावे घेता येतील.यांचा प्रत्यक्ष अनुभव आमच्याकडे आहे.इतर बरेच से अनधिकृत व अधिकृत असलेले मीडिया हाऊस या स्ट्रिंगर कडूनच पैसे वसुल करतात.अर्थात या ठिकाणी हा स्ट्रिंगर त्या मीडिया हाऊस मालकाला पेड न्यूज करून पैसे मिळवून देणारा एजंट म्हणून काम करतो व समाजात पत्रकार म्हणून मिरवतो.या एजंटांना सरकार दरबारी मान सन्मान मिळतो,कारण ते त्यांनाही पैसे मिळून देण्यास मदत करतात.यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.यावर निर्बंध घालण्याची मानसिकता सरकारची नाही. कारण सरकार चालविणारांचे गल्ली बोळातील भुक्कड कार्यकर्ते या एजंटांच्या जीवावर आपली राजकीय दुकाने चालवतात.समाजावर प्रभाव टाकण्यासाठी यांचा वापर करतात.
किती मर्यादित क्षेत्रासाठी काम करतात.
अलीकडे वर्तमान पत्रातील नवशिके उपसंपादक यांचे आदेशानुसार या स्ट्रिंगरला काम करावे लागते.एखादे कार्यालयात जुने मोकळ्यामनाचे उपसंपादक ,संपादक हे या स्ट्रिंगरला स्पेशल बातमी लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहन देतात. पण हा प्रकार अपवादाने घडू लागला आहे.काही संपादक तर या स्ट्रिंगर रिपोर्टर कडून काम करून घेतात त्यांचा अविर्भाव असा असतो जणू यांनी त्या स्ट्रिंगरला काम देऊन जन्माचे उपकार केले आहेत. ते त्याला सांगतात तुला एका चांगल्या ब्रँडला काम करण्याची संधी मिळाली आहे.त्याची कल्पना आहे का ? जणू हा स्ट्रिंगर दररोज त्या ब्रॅण्डच्या नावावर कपडे व किराणा उधार आणतो. त्याने चुकून पाठवलेली राज्यस्तरीय बातमी लोकल करून लावतात. वरून त्याला सल्ला देतात तुम्हाला दिलेल्या कार्यक्षेत्रातीलच विषय करा.हे ऑफिसात बसून साधा जिल्हाधिकाऱ्यांचा कोट घेत नाहीत एखाद्या स्ट्रिंगरच्या राज्यस्तरीय बातमीसाठी.महिन्याला वेळच्यावेळी पगार घेऊन फुकट काम करणारे स्ट्रिंगरला आपल्या ब्रँडचे कौतुक सांगतात.ग्रामीण भागातील स्ट्रिंगर रिपोर्टर कडून फुकटात काम करून घेतात व सर्वजणीक व्यासपीठावर सामान्यांच्या हक्कावर जोरदार चर्चा करतात अशा संपादक,मालकांचं मन दुखावण्याचा हेतू नाहीय. पण ते दुखावलं गेलं असेलच असे समजून दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझा हा लेख तमाम फुकट ,जाहिरात एजंट म्हणून काम करणारे स्ट्रिंगर रिपोर्टरला समर्पित आहे.
सहमत, याच व्यवस्थेचे माझ्यासह अनेक स्ट्रिंगर रिपोर्टर बळी ठरले आहेत…..