तरुणाईची माणुसकी 

जिंदगी कर ले तू सितम चाहे जितने ….. 

अच्छे लोगो की कमी नहीं इस दुनिया में ….. 

गेल्या पंधरवड्यात माझा अपघात झाला. जिथे झाला तिथे अंधार होता. मी माझ्या बाजूने होतो, समोरचे बाईकर त्यांच्या बाजूने होते. माझी गाडी ज्या ठिकाणावरून जात होती, नेमके तिथेच समोरच्या बाईकर ( मोटरसायकल ) चालविणारांच्या घरचा रास्ता या रस्त्याला येऊन मिळत असावा. म्हणून समोरच्या तरुणाने तिकडे आपली गाडी वळविण्याच्या  नादात,माझ्या कडे दुर्लक्ष  करीत अचानक गाडी माझ्या दिशेने वळवली. व मला समोरासमोर जोरदार धडक दिली.या धडकेने आम्ही दोघे रस्त्यावर पडलो. धडक देणारांची मोटरसायकल माझ्या मोटर सायकलवर पडली. माझा पाय या दोन मोटर सायकलच्या खाली अडकलेला होता. आपल्या चुकीमुळे अपघात झाला आहे. हे लक्ष्यात येताच त्या तरुणांनी आपली मोटर सायकल उचलून त्यांना जायचं होत त्या जोड रस्त्याला उभी केली. पळून जाण्याचा बेत बनवत होते. मी मात्र त्यांच्याकडून मदतची अपेक्षा करीत होतो.मला तुम्हाला कुठे लागलं का ? अशी चौकशी करतील असा विचार करत होतो.पण तस काही झालं नाही. 


संवेदना शून्य तरुणाईच दर्शन  

 

मला धडक दिली त्या बाईक वर तिघे होते. ही तिघे जेमतेम सोळा सतरा वयोगटाच्या असतील.एरवी फेसबुक ,व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली, हा अपघात झाला आहे, त्याची ओळख असेल तर संपर्क साधा. असे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या वयातले हे तरुण होते.यामुळे मला ते या धडके नंतर मदत करतील ,माझी माफी मागतील अशी अपेक्षा उराशी बाळगली होती. ती सपशेल फोल ठरली. त्यातल्या एकाने  कुठली मदत करण्यापेक्षा रस्त्यावर हे सर्व होतच असत आता निघा म्हणून आपल्या संस्काराची जाणीव करून दिली.ही मुले पळून जाण्याच्या तयारीत असल्याची जाणीव झाल्याने मी माझा पाय गाडीखालून निघताच सर्व प्रथम त्यांच्या मोटर सायकलचा नंबर माझ्याकडच्या एक कागदावर लिहून घेतला.त्यांच्या कडे लायसेन्स नसावे.


अमानवीयतेच
दुसरं रूप  

 

हा अपघात झाला, त्या पंधरा वीस मिनिटात तिथून दोन कार गेल्या, पहिली कार आली. तिचा चालक उतरला ,कारण माझी गाडी रस्त्यात पडलेली होती. त्यामुळे त्याची कार तिथून जाऊ शकत नव्हती. त्याने चौकशी केली. काय झालं ,तिथल्या एकाला माझी गाडी उचलण्यास सांगितलं .गाडी रस्त्याच्या कडेला लावून घेतली. मला कुठे लागले ? कसा झाला अपघात ? या ऐवजी तुम्ही केस करणार आहेत का ? हा प्रश्न करून त्याच्या कार कडे जाताजाता तिथे जमलेल्या माणसांना करू द्या याला केस, काही होत नाही, त्या पोरांना पळून जा असा सल्ला देत निघून गेला. त्याच वय तिशीच्या जवळपास असेल. या प्रकाराने मला चांगलाच धक्का बसला. आजवर आपण लोकांना धावून धावून मदत का ? करतोय असा प्रश्न स्वतःला विचारात होतो. कुठलाही संबंध नसताना हा चालक अपघात करून पळून जाण्याचा सल्ला कसा देऊ शकतो ? असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होते. आधीच अमानवीय असेवदनशीलतेने ओतप्रोत भरलेल्या मला धडक दिलेल्या तरुणानं हा चालक आणखी किती वाईट वागत येऊ शकते याचा धडा शिकवत असल्याचा संताप झाल्याने मला त्या गाडीचा नंबर लक्ष्यात राहिला. तो असा MH १४ सिरीस लक्ष्यात नाही ०८८९ इनोव्हा आहे. दुनिया गोल आहे.त्याची भेट पुन्हा होणारच आहे.

संस्कारक्षम माणुसकीच दर्शन


त्या गाडीवाल्याच्या या विक्षिप्तपणा आश्चर्य वाटत होत अश्या लोकांच्या  भरवश्यावर लोक जनसंपर्काची धंदा कसा करू शकतात याची उत्तर शोधत होतो.आज त्याने पेरलंय त्याची फळे त्यालाच खायची आहे. असा विचार करून मी मला धडक देणारे मुलांना कुठे लागलाय का याची चौकशी केली. आम्हाला दोघांना मुक्का मार लागलेला होता, मला माझ्या लोअर ऍबडॉमिन, टेस्टीजला चांगलाच मार लागला होता. त्याच्या वेदना होत होत्या तरीही त्या मुलांना कुठलीही मारहाण केली नाही.याच वेळी दुसरी कार आली. त्याने माझ्या मोटर सायकलचा MH १२ नंबर बघून आपली गाडी थांबविली.त्यातून तिशीतला तरुण खाली उतरला. ही गाडी कुणाची आहे ? कसा झाला अपघात ? ही विचारणा केली. त्याच्या मोबाईलच्या प्रकाशात आम्हा दोघांना कुठे लागलाय का ? याची खात्री केली. काका तुमची गाडी इथेच लावून द्या, तुम्हाला कुठे जायचंय ही विचारणा करून मी तुम्हाला घरी सोडतो म्हणाल्याने माझ्या अपघातांन होत असलेल्या वेदना कमी झाल्यासारखे वाटू लागले. त्याने मला धडक दिलेल्या पोरांचं निरीक्षण करून त्याच्या प्रत्यक्ष कृतीतून रस्त्यावर किती संवेदनशीलतेने व चांगले वागले पाहिजे याचा धडा शिकवला होता.मला गाडी चालवता येईल याची खात्री करून तो आपली गाडी घेऊन निघून गेला. जाताना त्याने मला धडक दिलेल्या मोटर सायकलचा फोटो काढून घेतला.याचवेळी साईबाबा संस्थांनचा मला ओळखणारा संपत काळे नावाचा कर्मचारी आपली डुटी सुटल्याने घरी जात होता. त्याने मला मदत करण्याच्या उद्देश्याने आपुलकीने चौकशी केली. मला धडक देणारे मुलं कुठले आहे ? याची चौकशी केली. पण तिथे जमलेले सर्व लोक बहुदा त्या मुलांना ओळखत होते. कारण त्यांनी एकानेही तूम्ही कुणाचे मुले आहे, कुठे राहता ? याची चौकशी केली नाही. म्हणून माझी शंका वाढली. 

GOOD HUMAN Being


केतन आढाव, संपत काळे ही माणुसकीची माणसं 

हॅण्डल बेंड झालेली गाडी हळूहळू चालवत घरी आल्यावर फॅमिली डॉक्टर भरत फापाळे यांनी उपचार सुरु केला. दोन दिवसांनी थोडे बरे वाटले. मग या अपघातात माणुसकी असलेले दोन लोक जे मित्र म्हणून जोडायला हवे त्यांना थँक्स म्हणायलाच पाहिजे त्यातलं पाहिलं नाव  दुसरं नाव अजून शोध सुरु आहे. ती व्यक्ती साईबाबा संस्थांनची कर्मचारी आहे.मग अपघातात एका तरुणाने माणुसकीने चौकशी करुन आपल्याला घरी सोडतो.म्हणून आपला वेळ दिला. हे त्याच वर्णन नितीन मीराने या मित्राला सांगितले.अवघ्या पाच मिनिटात त्याने तो तरुण ” केतन आढाव “आहे.फोन नंबर सह याची माहिती दिली.ती मिळताच केतनला संपर्क केला. मी त्याला शोधल्याचा धक्का त्याला बसला होता. पण रस्त्यावर माणुसकी दाखविणारा माणसांची आठवण लोक ठेवतात याची कल्पना त्याला देण्याचा व थँक्स म्हणण्याच्या उद्देश्याने त्याला शोधले.यातून त्याची मदतीची सवय सुखदायी असते ती अबाधित राहावी म्हणून त्याला फोन केला. आता  केतनशी मैत्री झालीय .त्याच्या स्वभावाचे नवनवे पैलू उलगडू लागले आहे. हा तरुण रस्त्यावर मदतीला धावून जाण्याच्या संस्काराचा आहे. मदत करणे हे त्याच्या सवयीचा भाग आहे.हे सर्व त्याने मला केलेल्या मदतीच्या कृतीतून जाणवले.आता दुसऱ्या चांगल्या माणुसकी असलेल्याचा शोध सुरु आहे.येत्या दोन दिवसात त्याला थँक्स म्हणायचं हे ठरलय.रस्त्यावर मदतीला येतात ती माणसं देव माणूस असतात.हा विचार प्रत्येकाने करावा.अपघात झाल्यापाषुन पुर्ण फिटनेस यायला महिना लागला.म्हणुन संपत काळेला थँक्स म्हणायला वेळ गेला.तरी त्याला भेटल्याने मन हलकं झाल हे खर 

संपत काळे Good human being

शिकवून गेला अपघात

या अपघाताने मला पंधरा ते तीस या वयोगटाच्या तरुणांच्या संस्काराचे व माणुसकीचे दर्शन घडले.यातले मला धडक दिलेले तिघे व पहिल्या कारचा चालक यांच्या अमानवीय वर्तनाचा माझ्या मानसिकतेवर झालेला वाईट प्रभाव दुसऱ्या कार ने आलेल्या तरुणाच्या म्हणजेच केतनच्या वागणुकीने निष्प्रभाव झाला. पण आपण कितीही चांगले चालक असलो तरी समोरचा नवशिकाच आहे हे नक्की झाले. दुसरे कायदे कितीही कडक करा ,अंमलबजावणी करता येत नसेल तर त्यांचा काय उपयोग ? मला धडक दिलेले तरुण कुठे मोठे अधिकारी झाले तरी ते समाजासाठी काही करू शकतील का ? असे अनेक प्रश्न डोक्यात घोळत आहे. शेवटी मी जोरात असतो वा मोठ्या गाडीत असतो ,तर त्या मुलांना चांगलीच इजा पोहचली असती.मग मला त्यांच्या नातेवाईकासह तिथे मानहानी केली असती. माझ्यावर केस केली असती. या वास्तविकतेचे भान आले. मी रीतसर लिहून आणलेल्या मोटर सायकलचा नंबर लिहून तक्रार दाखल केलीय.  

  

0 thoughts on “GOOD HUMAN Being/तरुणाईची माणुसकी”

Leave a Reply to Unknown Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *