केस स्टडी …
मित्रानो ,
केस स्टडी या पानातून आपल्या अनुभव व प्रतिक्रिया यातून आपल्या मदतीने आपल्या प्रशासकीय सेवेतील अडचणींवर प्रभावी पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीला किरकोळ वा मोठ्या स्वरूपाचं काम सरकारी कार्यालयात नेहमीच असत.
प्रत्येकाचा दृष्टिकोण
ही काम करून घेण्याची प्रत्येकाची वेगळी हातोटी आहे. अन प्रत्येकाचा परिणाम हा वेगवेगळा आहे.आपण खूप चांगले व इमानदार आहोत. हे दर्शविण्याचा जवळपास सर्व सरकारी कर्मचाऱ्याचा प्रयत्न असतो.तो प्रत्येक माणूस हा व्यक्ती म्हणून खूप चांगला असतो. पण जेव्हा तो त्या खुर्चीत बसून आपला अधिकार चालवतो. तो प्रत्येकवेळी तंतोतंत बरोबरच असेल असे नाही.व प्रत्येक वेळी आपण बरोबरच असू असेही नाही.हे जरी सत्य असेल तरीही नागरिक म्हणून आपले अधिकार हे सरकारी अधिका-यापेक्षा मोठेच आहे. कारण आपल्या देशात लोकशाही आहे. तेव्हा नोकरशहा आपल्यावर आरूढ होता काम नये.
काय उद्द्येश आहे
या माध्यमातून माझा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे कि , सरकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी सामान्य नागरिकांसाठी प्रामाणिक पणे काम करावे. त्यांचा मालक होण्याचा प्रयत्न करू नये . कारण या दोघांना दिलेले अधिकार हे लोकांच्या साठी सोयी सुविधा ,सुशासन ,सुरक्षा ,नागरिकांच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यासाठीचे आहेत. त्यांना वेठीस धरणे ,गृहीत धरून निर्णय लादणे यासाठीचे नाही.नेमकं हेच होतंय सध्या तरी.
समाजाचे सरकारी काम करून घेण्याची पद्धत त्यांच्या सोयीनुसार बरोबर वा चूक अशी पत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. काहींना पैसे देऊन काम करून घेणे योग्य वाटते. काहींना पैशाशिवाय काम व्हावे ,कारण प्रत्येक सरकारी नोकराला आपल्या कराच्या पैश्यातून वेतन दिले जाते. तर अनेक लोक हे या सरकारी कर्मचाऱ्याकडून माझे काम बिघडू नये, त्याने काही खोडी करून ठेवू नये. या भीतीने बहुतांश नागरिक सिस्टिमच्या विरोधात जायला तयारच नाही. असं होऊ नये याची काळजी प्रत्येक सरकारने घेतली पाहिजे. आपले सरकारं देखील ती घेतात. पण समस्त नागरिकाला संविधान ,कायदा कळतो हे गृहीत धरून ती रचना बनवितात. इथेच गणित चुकतेय म्हणूनच नोकरशहा हे जनतेचे मालक असल्याच्या अविर्भावात असतात. फार क्वचित अधिकारी व कर्मचारी हे लोकांच्यासाठी मनापासून काम करत असतात. परिणामी त्या कार्यालतच्या कामकाजात कुठलाही अडथळा येत नाही.
मन मोकळं करा व्यक्त व्हा . पुढच्या पिढ्यासाठी
यंत्रणेला जाब विचारणे हा नकारात्मक विचार असेल तर तो मला स्वीकार आहे. खुद्द आंबेडकरांनी अन्याय सहन करणारा हा अन्याय करणारा इतकाच दोषी असतो हा मंत्र आम्हाला दिलेला आहे. अन लोकशाही मध्ये सामान्य नागरिक हा सर्वतोपरी आहे.त्याच सोबत सर्वसमावेशक समानता हा आमच्या लोकशाहीचा मूळ आधार आहे.नेमके याकडेच आमचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.व सामान्य नागरिक जर सर्वतो परी आहे, तोच जर नसेल तर चार स्तंभ कोणासाठी काम करतील ?
तेव्हा आपल्या अनुभवांना या मंचावर सार्वजनिक करण्यासाठी आपल्याकडे असलेले कागदपत्र, आपला अनुभव शेअर करा. यातून कायमस्वरूपी उपाय किमान आपल्या पिढी पुरता तरी सुचवू या.
आपला स्नेहांकित
माधव ओझा