madhav ojhamadhav ojha

पुणतांबा ग्रामस्थांना विनंती .

समस्त पुणतांबा ग्रामस्थांना नमस्कार,
१९७७ साली माझा परिवार पुणतांबा गावात राहायला आलो. तेव्हा कारखाना सुरु होता . शेती महामंडळ जोरात होते . बाजारपेठ तेजीत होती . टपरीपासून सावकारी पर्यंतचे धंदे तेजीत होते . गावातल्या सर्व शाळेत भरपूर विद्यार्थी होते. पॅसेंजर सह महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबा होता .सकाळी व संध्याकाळी एक बस श्रीरामपूरला जाण्यासाठी होती . पुढे हि व्यवस्था आणखी चांगली झाली , एक वैजापूर बसच्या दोन फेऱ्या ,अहमदनगर बसच्या दोन फेऱ्या , मांजरी बस सुरु झाली . कोपरगाव मुक्कामी बस सुरु झाली . दोन जाणाऱ्या ,दोन येणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सुरु होत्या . हे सर्व नव्या पिढीला कळावं म्हणून लिहिलं आहे .

आजच पुणतांबा कस आहे ?

आज आपली मूल, मुली मुंबई , पुणे ,बंगलोर , औरंगाबाद , नाशिक शहरात चांगल्या कंपन्यात कामाला आहेत . त्यांना घरी यायचं असेल तर वेळेवर गाडी नाही . त्यांना घ्यायला सोडायला शिर्डी , कोपरगाव , श्रीरामपूर येथे जावे लागते . शंभराच्या घरात कोपरगावला, वीस पंचवीस मूल, मुली श्रीरामपूरला कॉलेजला जाणारे मुलासाठी वेळेवर बस नाही. गावाला पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना आल्या तरी शुद्ध पिण्याचे पाणी नाही . शाळा ओस पडत आहे . व्यापार मंदावला आहे . टूकारगिरी वाढत आहे .नुकतीच आषाढीची यात्रा झाली नेहमीपेक्षा किती तरी कमी गर्दी होती. ज्या यात्रेला लाखभर भाविक येत त्या यात्रेला वीस तीस हजर भाविक आले होते . हे आजच चित्र आहे .

आता मुद्द्याचं बोलू या .

मला जे वाटते ते आपल्याला सांगतो.
या पाच मागण्यासाठी आग्रह धरू

१] गावातील श्रीरामपूर ,कोपरगाव याठिकाणी शाळा ,कॉलेजला जाणारे विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे सोयी करीता कोरोनाच्या आधी जश्या रेल्वे, एस टी बस सुरु होत्या तसे दळणवळण पुन्हा सुरु करावे .
२] गावच्या पाणी पुरवठयाची चौकशी करून त्यातील दोषींवर गुन्हे दाखल करून प्रत्येक ग्रामस्थाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे .
३] पुणतांबा गावात नियुक्त शासकीय , निमशासकीय कर्मचारी यांनी मुख्यालयी निवासाला राहिलेच पाहिजे .
४] गावाला जोडणारे सर्व रस्ते रामपूरवाडी ,न प वाडी ,जळगाव ,वाकडी डोणगाव ,पुरणगाव ,मातुलठाण ,बाभुळगाव, कोपरगाव हे सर्व रस्ते डांबरी करणे .
५] संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रत्येक नागरिकाचे सुरक्षेचा उपाय कार्यन्वित करावी.

हे होईपर्यंत निवडणूक नको

या पाच प्रमुख मागण्याकरीता आपण सर्वानी आग्रही असावे . आज मितीला आपल्या गावातील गाव पुढारी या सर्व जबाबदाऱ्या,निपक्षपातीपणे पूर्ण करण्यात असफल आहे . किंवा ते फाजील राजकारण करण्यात या श्रेयवाद , यश अपयश यात गुंतून या कामांची जबाबदारी एकमेकांवर ढकलून नोकरशाहीला पळवाट काढून देत आहे . आज आपल्या गावावर प्रशासक आहे . हे कुठल्या राजकीय पक्षाचे नाही, कुणाचे जवळचे नाही . ते त्रयस्थ आहेत. त्यांच्या वर या जबाबदाऱ्या निश्चित केल्या तर त्या जबाबदारीने पूर्ण होतील. ते त्यांना बंधनकारक असेल .आपण त्यांना जाब विचारू शकतो.
यावर उपाय म्हणून आपण सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावाची निवडणूक थांबवावी यासाठी प्रयत्न करावा. व प्रशासकांकडून आपली कामे पूर्ण करून घ्यावी त्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाऊ नये .

त्यानंतर यावर विचार करू शकतो .

आपलं गाव कितीही सक्रिय असले तरी ते मुख्य प्रवाहाला जोडलेले नाही . त्यामुळे इथला कुठलाही प्रतिकाराची दाखल सरकार घेत नाही . त्यांची प्रशासकीय व्यवस्था घेत नाही. परिणामी आपल्या गावचा विकास खुंटला आहे . व्यापार ठप्प होत आहे . रोजगार निर्मिती थांबली आहे.यावर फोकस करताना आपल्याला अडथळा येऊ नये म्हणून या पाच मागण्या शंभर टक्के पूर्ण होत नाही तो पर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्याच हाती ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊ नये असे मला वाटते .आपल्या प्रतिक्रिया मुक्तपणे नोंदवा.

One thought on “There is no election until the demand is met”
  1. Yes I am 100 aggre on this we need and this basic need when I travel to Puntamba their so many problems water, road, this is basic need most of I observed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *