साईचरणी लुटारूंची वर्णी

आम्ही कारभार सांभाळला,तेव्हा संस्थानचे उत्पन्न साठ कोटी होते.आज एक कोटी रुपये दररोज दान येत आहे.हे उदगार कुण्या कारखानदाराचे नाही,तर ते श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांचे आहेत.
१९ व्या शतकातील संत ज्या साईबाबांनी कुठलीही प्रवचने दिली नाही,पुस्तके लिहिली नाही,तत्वज्ञानाचे धडे दिले नाही,जाती भेद केला नाही.केवळ मानवता,मुक्या प्राण्यांवर दया,भुकेल्याला पोटभर अन्न,उपेक्षित गोरगरीबांची सेवा करीत सबंध जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला.इंग्रजाच्या काळात समाजात एकोपा राहावा यासाठी साईंनी सन,उत्सव मोठया उत्साहात साजरे करीत.अशा साईबाबांनी अहमदनगर जिल्हयाच्या शिरडी गावात सुमारे साठ वर्ष वास्तव्य केले.याच गावात बाबांची संजिवन समाधी आहे.
साईबाबांनी आपल्या हयातीत व्दारकामाई मंदीरात अनेकांना दररोज शेकडो रुपयांचा पगार वाटत,एव्हढेच नव्हे तर दिवसाला किमान दहा,वीस लोकांना ताजे अन्न आपल्या हाताने शिजवुन खावु घालीत असे.हे सारं अशा काळात सुरु होत की जेव्हा एक रुपया गरीबांना पहायला मिळने तर सोडा चार आण्यासाठी दिवसभर चाकरी करावी लागत असे.कुबेराचे रुप असलेल्या साईंच्या या मायाबाजाराला पाहुन व बाबांनी केलेल्या रुग्णसेवेच्या चमत्कारामुळे इंग्रज सरकारने बाबाकडे एवढे पैसे कुठुन येतात हे सर्व काय सुरु आहे,याची हेरगिरी करण्यासाठी पोलीस नेमले होते.या सा-या चमत्कारी घटना देशभरच नव्हे तर जगभर पसरलेल्या होत्या म्हणुनच तर त्या काळीही साईबाबांकडे विदेशातुनही भक्त येत.                                  
त्याकाळीही बाबांन कडे येणारे भाविकांत सहजासहजी चमत्कारांवर विश्वास न ठेवणारे उच्च विद्याविभुषीत व श्रीमंत भक्त मोठया प्रमाणात येत,पुढे १५ आक्टोबर १९१८ वार मंगळवार रोजी साईबाबांचे महानिर्वाण झाले,बाबांच्या निर्वाणानंतर मायाबाजार संपला,दररोज मिळणारा पगार बंद झाला.बाबांच्या समाधीची देखरेख दुर्लक्षित झाली,समाधीवर तरवडाचीही फुले कुणी टाकत नसे हि बाब शिरडीकरांना जिव्हारी लागणारी असली तरी खरी आहे,या दुर्लक्षाने दुखी काकासाहेब दीक्षित यांनी पुढाकार घेऊन १३. २. १९२२ साली जिल्हा कोर्टाकडून मंजुरी घेवुन साईबाबा संस्थान मंडळाची स्थापना केलीया मंडळावर सुमारे २५ वर्ष दासगणू महाराज या संस्थानचे अध्यक्ष होते काही विवादानी सन १९६०  साली हे मंडळ बरखास्त करीन  साई संसाथांचा कारभार हा कोर्ट रिसिव्हर ने ताब्यात घेतला पुढे १९८४ साली राज्य सरकारने धर्मदाय आयुक्त मार्फत येथे विश्वस्थ नेमून कारभार पहिला.
.त्यानंतर या संस्थानावर जवळ पास सहा अध्यक्षांनी कारभार सांभाळला, यात द .म. सुकथनकर यांना सर्वाधिक काल मिळाला त्यानंतर जयंत ससाणे यांची आठ वर्षाची कारकीर्द होती.
या आठ वर्षात या मंडळात कॉंग्रेसच्या कोठ्यातून आलेल्या विश्वस्थाना सरकारातील विलासराव देशमुख,अशोक चव्हाण सारख्या नेते मंडळीची  मेहरनजर असल्याने तीन वर्षासाठी नियक्त झालेल्या या मंडळाला मुदत वाढ  विनासायास मिळाली.या बदल्यात सरकारच्या जबाबदा-या या मंडळाने आवडीने उचलल्या त्यासाठी २००४ च्या आधीनियमात सुधारणा केल्या याच सुधारनानच आधार घेत शिर्डी नगर पंचायतचे रस्ते,पाणी पुवठा योजनेचे पैसे,शहर साफसफाई साठी वर्ष काठी लाखो रुपये ,साईबाबांच्या तिजोरीतून खर्चाचे मार्ग मोकळे करून दिले.दिवसेंदिवस भाविकांची वाढणारी संख्या यांना पायाभूत सुविधा पुरविणे हि एकट्या साई संस्थांनाची जबाबदारी असू शकत नाही यासाठी राज्य सरकारने पुढे यायला हवे मात्र तसे झाले नाही.उलट आपल्याला आणखी अधिकार मिळाले तर आपण परिसराचा विकास करू अशी स्वप्न या विश्वस्थानी सरकारला व परिसरातील जनतेला दाखविली.त्यातील किती पूर्ण झाली व पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही झाली हे साईच जाणो.
sai samadhi mandir
या काळात साई बाबांना दान रूपाने शेकडो किलो सोने आले,त्याबदल्यात कुठलाही विचार न करता सोने दान करणारांना व त्याचे कुटुंबियांना तह हयात वी आई पी दर्शन आरत्यांची सवलत देण्याचे ठराव करून सामान्य साई भक्तावर अन्यायच केला आहे.पुढे या मुद्द्यावरून वादळ उठले तेव्हा हा ठराव मागे घेण्यात आला.तरीही त्या धनिक भक्त आदिनायरन रेडी यांचं दिमतीला संस्थान प्रशासन झुलत राहिले
या जयंत ससाणेच्या टीम ने या कार्यकाळात शिर्डीत येणारे व कितीही वेळा दर्शनाला येणा-या कॉंग्रेस नेते मंडळी व त्यांच्या आप्तस्वकीयांना हजारो रुपयांच्या साईंच्या मुर्त्या भेट देऊन सरकारातली नेतांची मर्जी संपादन करणाऱ्या या मंडळाने कधीहि कुण्या एखाद्या सामान्य साई भक्ताला मूर्ती भेट दिली आहे का या बाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.विश्वस्थांनच्या या कृतीने चांगला साई संदेश गेला आहे असे वाटण्याचे कारण नाही.
या मंडळाने प्रशस्थ प्रसादालय बांधले या बाबत कौतुक केले जाऊ शकत होते मात्र यात श्रीमंत भाविकांची वेगळे व गरीबाची वेगळी भोजन प्रसाद व्यवस्था सुरु करून भक्तात भेदभाव करण्याचे काम केले.ज्या साई बाबांनी स्वतः भिक्षा मागून जेवण केले व गोर गरिबांना आपल्या हाताने अन्न शिजुउन खाऊ घातले त्या देवस्थानात आज सहाशे कोटी रुपये शिल्लक असताना हि भाविकांना मोफत प्रसाद देण्या ऐवजी चार रुपयांचे जेवण दहा रुपये करून आपली भाविका साठीची आस्था उघड केली आहे.
पत्र यायला १५ दिवस लागतील अशा काळात दासगणू महाराजानि मराठवाडा विदर्भात नारदीय कीर्तनाचा माध्यमातून साई बाबानचा प्रचार प्रसार केला,याच काळात नार्सिहा महाराजानी १९२३ मध्ये पहिले साई मंदिर बंगलोर येथे बांधले.या दोघांनीही बाबांच्या प्रचारात कुठेही कसर ठेवली नव्हती. आजच्या माहितीच्या  युगात साई बाबा संस्थान भाविकांच्या पैशाने परदेश वा-या करण्यात गुंतलेले होते.व ज्या देशात आधीच साई बाबांची मंदिरे आहेत तिथेच जाऊन प्रचार करण्याचा धडाका या मंडळीनी लावला.याचे फलित म्हणजे एक आमदार असताना ज्या जयंत ससाणे,गारगोटी संघ्रलायाचे मालक म्हणून कृष्णकांत पांडे,कुठल्यातरी कारखान्याची महिला सदस्य म्हणून उर्मिला जाधव यांना इंग्लंडच्या अल्बर्ट होलच्या स्टेज वर सहज सहजी संधी मिळाली नसती मात्र  या ठिकाणी केवळ साई बाबा संस्थानचे विश्वस्थ म्हणून या मंडळीना भाविकांच्या पैशाने जाता आले.या प्रचार प्रसाराने भाविकांची गर्दी वाढली तर त्यांना राहायला भक्त निवास आहेत का ? दर्शनाला व विदेशातून आलेल्या भाविकाला योग्य मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था संस्थान कडे आजही नाही.या ठिकाणी पगारी नोकर काम करतात सेवा देणारे सेवेकरी नाही या महत्वाच्या बाबीकडे या मंडळाचे लक्ष कधीही गेले नाही.
धार्मिक पर्यटन विकासाला चालना मिळावी हि संकल्पना डोळ्या समोर ठेवत कामाला सुरुवात केली,आपल्या मतदार संघातील गावातून नियमबाह्य वळण घेत जाणारा शनी शिंगणापूर रस्ता बांधला तो अद्यापही पूर्ण झालेला नाही,खरोखरीच निस्वार्थ वृतीने धार्मिक पर्यटन विकसित करायचे होते तर तुळजापूर,पंढरपूरला जी मदत केली तीच राहात्याच्या उपासनी महाराज देवस्थान ,पुणताबा येथील गोदाकाठावरील पुरातन मंदिरांचा,बाभूळगावच्या चीदम्बराचा नव्हे तो बेलापूरच्या केशव गोविंदाचा,न्यानेश्वाराचा नेवाशायचा,अशा या २५,५०  कि.मी. अंतरा वरील धार्मिक तीर्थस्थळा विकसित करता आली असती प्रसंगी हि देवस्थानच दत्तक घायची होती म्हणजे अपोआपच धार्मिक पर्यटन विकसित झाले असते.
रामणींच्या साई मंदिर संस्थान चेनैई यांनी साई आश्रम हे भक्त निवास बांधून देण्याचा निर्णय घेतला हे भक्त निवास २००९ मध्येच संस्थानला मिळणार होते त्याचेही काम सध्या रखडलेले आहे.यात रमणी यानाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.मंदिर परिसरातील भक्तांच्या  सुरक्षेसाठी उभारलेली अद्ययावत सौरक्षण व्यवस्था आजही पूर्ण कार्यान्वित झालेली नाही,त्याच बरोबर यात भाविकांचा येण्याचे रेकॉर्ड होते मात्र तो बाहेर गेल्याची नोंद होत नसल्याचे व याचे संग्रहण बोटावर मोजण्या इतकेच दिवसांचे असल्याने यातून काही मदत होईल असे म्हणणे आज चुकेचे वाटू नये.आज संस्थाना कडे कोट्यावधी रुपये आहेत याचा उपयोग मतदारांचा व मतदारसंघाचा विचार बाजूला ठेवल्यास  परिसराच नंदनवन होईल हे नक्की .
या आठ वर्षात विश्वस्थानी प्रसिद्धीत राहण्या साठी हजारो निर्णय जाहीर केले, अंमल बजावणी मात्र शून्य.अलीकडे हि विश्वस्थ व्यवस्था अनेक विवादात अडकल्याने व श्रीमंत व राजकीय लोकांच्या सेवेत वारंवार दिसल्याने सामान्य भाविकांचं प्रतिनिधित्व करीत स्तानिक साई भक्त राजेंद्र गोंदकर,संदीप कुलकर्णी सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी थेट उच्च न्यायालय गाठले.यात न्यायालयानेही राज्य सरकारला चांगलेच फटकारले त्यानंतर पुन्हा जयंत ससाणे यांनाच अध्यक्ष करीत नवे १५ विश्वस्थ नियुक्त केले,या निवडीलाही आज आव्हान देण्यात आल्याने नव्या मंडळास तृत न्यायालयाने स्तगीती दिली आहे यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.येत्या काही दिवसात आणखी या मंडळानी घेतलेल्या काही नियमबाह्य अवैध निर्णयांवर कार्यवाही साठीचे नवनवी प्रकरणे न्यायालयात आल्यास वावगे वाटण्याचे कारण नाही. असो.
 मा. उच्च न्यायालयाच्या सरकारला दिलेल्या चपराकिने सामान्य साई भक्ताला विश्वस्थ होण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.सोबतच सरकारच्या  मनमानीला पायबंद घातला जाणार आहे.
या आठ दिवसात संस्थान अध्यक्ष जयंत ससाणे यांनी प्रसार मध्यमच  नाही तर साई दर्शनाला येणार मोठ्या नेत्यांना दानाच्या आकडेवारीचा कागत दाखवायला सुरुवात केली होती.या प्रत्येक वेळी त्यांना आपण एक तेजस्वी संताचा संस्थानाचा कारभार पाहत आहोत याचा विसर पडला होता हे नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *