समृद्धी महामार्ग ,अपघातांच्या वाढत्या घटनां.
टायर फुटण्याच्या घटनांची मालिका सुरूच
मात्र, पहिल्या दिवसापासून या रस्त्यावर टायर फुटण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. अशा घटना आणि या कारणामुळे येथे काही अपघात घडतात. दररोज कुठे ना कुठे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागत आहे.टायर फुटण्याच्या आणि अपघातांच्या वाढत्या घटनांना तोंड देण्यासाठी रोज नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे गडकरींची चिंता कमी करण्यासाठी एक नामांकित टायर कंपनी पुढे आली आहे. त्यांनी शिर्डी ट्रान्झिट पॉईंट वर पुढचे तीन महिने यावर येणारे वाहनांचे तयार तपासणी व टायरमध्ये मोफत नायट्रोजन भरून देण्याची व्यवस्था केली आहे.याच्या उदघाटनाला राज्य परिवहनच्या आयुक्त विवेक भिमनवार ,अभय कळसकर याच्यासह जिल्ह्यातील संपूर्ण टीम ने हजेरी लावली होती. त्याकार्यक्रमाला मुद्दाम हजेरी लावली तेव्हा काही ठळक बाबी लक्ष्यात आल्या, त्याची माहिती मिळाली.समृध्दी महामार्गावर १० एप्रिल पासून आतापर्यंत १५ हजार वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात येवून ७५० वाहनांना खराब टायर अभावी समृध्दीवर प्रवेश नाकारण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी दिली.
समृद्धी महामार्ग वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांनो सावधान
त्यानुसार या जलदगती महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांना आता कोकमठाण येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर थांबवण्यात येणार आहे. त्यांचे समुपदेशन केले जाईल यात वेग मर्यादा ओलांडल्याने अपघात कसे होतात याच्या फिल्म दाखविण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचे कडून मी वेगमर्यादेचे पालन करीन असे स्वयं घोषणापत्र लिहून घेतले जात आहे.या सर्व प्रक्रियेसाठी सुमारे अर्धा तास या टोलनाक्यावर थांबावे लागणार आहे.मग जलदगती महामार्गावर प्रवास करण्याचा उद्द्येश सफल होतो का ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही .
महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आरोग्यदायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही

या किंवा इतर कारणांमुळे इथे थांबताना चहा-नाश्त्याची सोय नाही. याशिवाय अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आरोग्यदायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. कि जे संतापजनक आहे. या व्यवस्थेचे कुरूप स्वरूप उघड होत आहे. समृद्धी महामार्गावरील या टोल नाक्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार स्वच्छतागृहाजवळ पीव्हीसी पाण्याची टाकी उन्हात ठेवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे टाकी उघडी आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याशिवाय या रस्त्यावर अपघात झाल्यास सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. असे सरकारकडून सांगितले जात असले तरी या ठिकाणी उभी असलेली सील आहे. व हि स्पेअर असल्याचे सांगितले जाते. अशी रुग्णवाहिका पाहून यंत्रणा किती संवेदनशील आहे, याचे उत्तर मिळते.या टोल नाक्यावर काम करणारे मुलांचे एक महिन्याचा पगार याचा ठेकेदार अडवून ठेवत आहे.
