शिरडीवाले साई
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एक संत भूमी शिर्डी . तीस पस्तीस हजार लोकसंख्या असलेले दिड दोन किलोमीटर त्रिजेचे शहर शिर्डी हे आहे. या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे “साईबाबा “ या साईबाबांच्या भक्तांची संख्या तुम्हाला चकित करणारी आहे. वर्षा काठी सुमारे तीन कोटी भाविक याठिकाणी असलेल्या साईबाबांच्या मूळ समाधीवर नतमस्तक होण्यासाठी येतात. या भाविकांत कोट्यधीशांची संख्या हि प्रचंड आहे.दिवसाला सुमारे साडेतीन चार अतिविशिष्ठ हे साईच्या चरणी नतमस्तक होतात. सामान्य भाविकही कोट्यवधींचे दान साईंच्या दक्षिणा पेटीत टाकतात . परिणामी बाबांच्या तिजोरीत आज मितीला कोट्यवधी रुपये जमा आहेत.
साईबाबांच्या दर्शनाला यायचंय ? त्या आधी हि सूचना वाचा.

वाचल असेल तर मग या वेबसाईटला भेट द्या .
याठिकाणी तुम्ही आपल्या निवासाची दर्शनाची व्यवस्था करण्यासाठीचे आगाऊ बुकिंग करू शकता. याशिवाय साईबाबा विषयीची अधिकृत सर्व माहिती तुम्ही या वेबसाईट वरून मिळवू शकता. तसेच याठिकाणी तुम्ही केलेल्या दानाचा विनियोग संस्थान कसा करते याची माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्हांला कुठल्या शीर्षकाखाली देणगी द्यायची हे ठरवू शकता.
या सर्व माहिती सोबत तुम्हाला साईबाबांचे सुंदर फोटो देत आहे.
हे सर्व साईबाबांच्या अधिकृत फेसबुक पेज वर उपलब्ध आहेत.

















