आमदारांना पगार (मानधन) किती मिळते ? मित्रांनो ,
” नेमेचि येतो पावसाळा “या उक्ती प्रमाणे भारतीय लोकशाहीचा उत्सव म्हणजेच “निवडणूक” होत आहे. लोकसभेला नागरिकांनी एकमुखी दिलेला कौल आता राज्य सरकारलाही हवा आहे. त्यासाठी महाजनादेश पूर्ण करून आपली प्रचार फेरी सत्ताधा-यांनी पूर्ण करून घेतली.
विरोधकांनी का कुणास ठाऊक पण त्यांनी आपल्या अस्तित्वाची कुठलीच जाणीव करून दिली नाही. त्यामुळे सत्ताधारी आणखीच उत्साहित आहेत. असो प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका ठरलेली असते. तरीही एक बाब आपल्या समोर आणून देण्यासाठी हा लेख लिहिला आहे.
सत्ताधारी असो कि विरोधक दोघानांही फक्त आपल्याच हाती सत्ता असावी असे वाटते.असे वाटण्याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक मुद्दे जे सामान्य मतदारांच्या समोर कधीच येत नाहीत असे आहेत. पण ते सर्व गंभीरपणे विचार करण्याचे मुद्दे आहेत.
त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या
आमदारांना पगार (मानधन) किती मिळते ?
याचे उत्तर मी गूगल वर शोधण्याचा प्रयत्न केला तर ते सापडत नाहीत. विशेष म्हणजे सरकारच्या कुठल्या संकेत स्थळावर याची माहिती आहे,याचा शोध तुम्हाला लागला तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या दोन महिन्याच्या शोधात मला ठराविक वर्तमान पत्रांच्या कात्रणांत हे सापडले. त्यापैकी अगदी स्पष्ट असे “लोकसत्ता” या दैनिकात वाचायला मिळाले. त्यांच्याच बातमीचे कात्रण मी इथे दिलंय .
सौ. लोकसत्ता

ही बातमी वाचा ,तुमचे डोळे उघडतील. या आमदारांना सुमारे २ लाख पेक्षा अधिक वेतन व भत्ते मिळतात.संपूर्ण पाच वर्षांत मिळणारी ही रक्कम सुमारे एक कोटी वीस लाख इतकी होते.मग मला सांगा राज्यभर फिरायचे पैसे जनतेच्या करातून या मंडळीला दिले जातात.हे सर्व ” व्हाईट “ उत्पन्न आहे. तरीही यांना मिळणा-या आरोग्य सेवा,मोफत प्रवास , मोफत संगणक ,पती पत्नीला परराज्यात मोफत रेल्वे प्रवास हे सर्व जनतेच्या पैश्यातून दिल जातंय. मग मला सांगा हे सार आपल्यालाच मिळावं अशी अपेक्षा या सर्व साध्या सरळ लोकनेत्यांनी ठेवली तर ती अपेक्षा चुकीची नाहीच.
हेच नेमकं कारण आहे, हे वैभव ,सोयी सुविधा,ऐषोआराम अन्य कुणाला मिळू नये म्हणून ही मंडळी कुठल्याही थराला जाऊन आपणच सत्तेत राहावं यासाठी प्रयत्न करतात.व आपल्याला भुलवून नेहमी सत्तेत राहण्यात यशस्वी झाले आहेत.
आता तरी डोळे उघडे ठवून मतदान करा. आपले कर्तव्य म्हणून आपण मतदान करत आहोत.यामुळे माझ्या देशाचे,समाजाचे कुठले नुकसान होणार नाही. आपल्यावर कुणी एकाधिकार गाजविणारी नाही याचा विचार केला पाहिजे. नुसते मतदान करू नका तर आजवर ज्यांना निवडून दिले,यांनी देशासाठी समाजासाठी केलेले काम याचा पुरावा मागा.हे आपण निवडलेले विश्वस्त आहेत,देशाचे किंवा आपले मालक नाहीत याची जाणीव करून देण्यासाठी निवडणूक हा लोकशाहीतील सर्वात शक्तिशाली पर्याय आहे.आपल्या एका मताने रस्त्यावर फिरणारे कफल्क व्यक्तिमत्वाला सत्तेच्या गादीवर बसवू शकतो. तसेच आपल्यावर हुकूमत गाजविण्याच्या इराद्याने वारंवार आपल्या मताच्या जीवावर फक्त स्वतःचेच भले करून घेतात त्यांना घरचा रस्ता दाखविण्याची हिम्मत आपल्या एका मतात आहे.
आपल्याच पैशांची आपल्यावर उधळण करून स्वहित साधने म्हणजे लोकसेवा नव्हे व देश सेवा ,देश भक्ती तर नक्कीच नाही.आपल्याला विचार करायला भाग पाडणे,आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव करून देणे हा उद्देश आहे. जे सत्तेबाहेर राहतात ते पाण्याबाहेर काढलेल्या माश्यासारखे तडफडतात. हा अनुभव आपल्या एका मताने या आमच्यावरच दादागिरी करणारांना करून देऊ शकतो.
वंदे मातरम
छान