लॉकडाऊन आणि दर दिवशी बदलणारी मानसिकता
टाळेबंदीच हा सत्ताविसावा दिवस
आज 17 एप्रिल 2020 आपल्या देशातील टाळेबंदीच हा सत्ताविसावा दिवस उजाडला.नेहमीप्रमाणे उशिरा उठणे हा गेल्या महिना भराचा वाईट सवयीचा परिपाठ झाला आहे.दुपार पासुन गावतल्या BSNLच्या सेवा बंद पडल्या आहेत.आता किती वेळ माझ इंटरनेट बंद असेल सम्पर्क व्यवस्था बंद असेल हे माहित नाही.यामुळेही असे वाटत की खरोखरीच आम्ही या संधीच सोन करण्यास समर्थ,परिपूर्ण आहोत का ?आपल्यात चीन,अमेरिका,रशिया,इज्रायल,जापान असे राष्ट्रप्रेम खरोखरच आहे का ?
भयाने संपुर्ण देश पछाडले
असो गेले महिनाभर कुठल्याश्या अनाहूत भयाने संपुर्ण देश पछाडलेल आहे.याच कोरोना असे नाव आहे.सर्वत्र एक वाक्यात यावी म्हणून जगभरात या महामारीला कोविड़19 अशी ओळख दिली आहे.याचा उदभव चीन मधील हुबोई प्रांतात वुहान शहरात झाली.पुढे या रोगाचा म्हणजेच कोरोना विषाणूचा संसर्ग चीन मधून प्रवास करणारे व्यवसायिक,पर्यटक,विद्यार्थी,प्रवासी यांच्या माध्यमातून जगातील सुमारे 192 देश्यात पोहचला.अन प्रत्येक देश्यातील नागरिकांच्या दिनचर्या,जीवन शैली,आहार विहार, व्यसन,व शारिरीक विकार यानुसार कोविड़ 19 या विषाणुने तिथल्या नागरी समाज आणि संस्कृती सहजीवन शक्तीवर अघात करण्यास सुरुवात केली. प्रत्येक देश्याच्या भौगोलिक व जीवनशैलीने वेगवेगळ्या लक्षण माध्यम बनून तिथले नागरिक हे संसर्ग बाधित झाले. साधारण 7,8 डिसेंबर 19 ते आज 17 एप्रिल पर्यंत संपुर्ण जगात सुमारे 1 लाख 37 हजार पिडीत नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.याशिवाय या विषाणच्या संसर्गजन्य रोगावर मात करुन बरे होवुन घरी जाणारंची संख्या ही लक्षवेधी आहे.ती जवळपास चार लाख सदुसष्ट हजार आहे.
या चार पाच महिन्याच्या कालावधीत संपुर्ण जग टप्प्यांमध्ये टाळेबंदीच्या उपायाने या विषाणूला रोखण्यचा प्रयत्न करत आहेत.खर तर टाळेबंदी हा पर्याय या संसर्गाला लांबवने यासाठीचा आहे.या कालावधीत त्या त्या देशानी आपल्या देश्यातल्या वैद्यकीय साधन सुलभता विकसित करण्यासाठी मदत मिळते.यातुन टाळेबंदीच्या दरम्यान सरकारला आपल पुर्णलक्ष या विकासाकडे देता येते.हेच समोर आले.वास्तविक पहाता हे महामारी अचानक जगावर हावी झाली आहे.तेव्हा थोडंफार सावरायला सर्वाना वेळ द्यावा लागणार आहे.हे संकट चीन ने जाणिवपूर्वक वाढवल आहे.व हे पुर्व नियोजित षडयंत्र आहे .हे हळू हळू शोधल जाईल.पण यात ज्याने जीव गेले त्या कुटुंबाची वाताहतीची जबाबदारी नेमकी कुणी घ्यायची हा प्रश्न सतत सलणार आहे.हे सर्व निरपराध बळी आहेत.ज्यांच शत्रुत्व कुठल्या सरकार वा चीनशी नक्किच नव्हत हे ही सत्य आहे.
या संकटाचा सामना करताना उपस्थित झालेले गंभीर प्रश्न
तीन महिन्यात संपुर्ण जगाला वळसा घालुन आलेल्या या विषाणूने भारतावर आक्रमण केले आहे.यामुळे जगातील प्रगतीचे बुरखे फाडले.याच विकास व प्रगतीच्या जोरावर जगाला वेठीस धरत होते असे अमेरिका, ब्रिटन ,रशिया ,इराण ,इराक सर्व किती हतबल आहेत.हे सत्य समोर आले.जगातील स्पेस स्टेशन,बिगबैंग (देवकण ) शोधायची भानगड,चन्द्र्यांन ,मंगळयान, सूर्याच्या जवळ जाण्याचा कार्यक्रम, देशांची सुरक्षा रक्षणासाठीचे अब्जावधीचे विमान,तोफा,जहाज,बोटी,बंदुका,गोळ्या,दारुगोळा यांचे सौदे हे सर्व शक्तिहीन ठरले आहे आज.या निमीत्ताने एक प्रश्न उभा ठाकला आहे.तो म्हणजे हे सर्व सुरक्षा उपाय व विविध शोध,शश्रास्र विकास का साधायचा होता जगाला ?
या चार महिन्यांचा कालावधीच निरिक्षण केले असता हा प्रचंड भय निर्मिती कालखंड आहे.जागतिक मानवी जीवनात भय निर्माण करुन समस्त सरकार ही आपल्यासाठी किती जीव तोडून काम करतात,हा आभास निर्माण करण्याच्या उदेश्याने हे सर्व नियोजन बद्ध पद्धतीने केलेलं षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे.यातुन जगाला काय साधायाचे आहे ? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या मनाला विचारला तर उत्तरात बरीच पोटप्रश्न उभी आहेत त्याने बरच काही समोर येतयं, यामुळे असा संशय घेतला जावू शकतो.
- 1. सरकार चालविण्यासाठी प्रत्येक सरकारन दिलेल्या सोयी सुविधा त्या त्या सरकारच्या मुळावर उठल्या आहेत.
-
- 2. आपल्या नियम कायदे बनविण्याने जल वायू परिवर्तन पुन्हा पुर्ववत करु शकत नाही.
-
- 3. सरकार जनतेच्या हितासाठी किती परिश्रम घेत आहे.हे दाखविण्यासाठी …
-
- 4. जगातील पश्चिमेकडच सत्ता केंद्र पुर्वे कडे आणण्यासाठी …
-
- 5. स्वत:च्या सामर्थ्याची जाणिव करुन देने व घेने यासाठी
-
- 6. अलिकडे लोक सरकारला जाब विचारु लागले आहेत.यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न असफल होइल यावर उपाय म्हणून हा?
-
- 7. जगातल्या श्रीमंत असलेल्या लोकांवर अंकुश मिळावने किवा त्याना समान्य लोकानी धक्का लावू नये म्हणून कारण अलिकडे जागतिक जन मानसात समानतेचा अधिकार बळकट होतोय.
-
- 8. गेल्या दशकात जगात आय सी स ,जिहाद,रोहिग्या, इज्रायल,पल्येस्तींन यां सारखे जागतिक दर्ज्याचे वाद यासह अनेक प्रश्न आहेत.
-
- 9. सर्वात महत्वाचा म्हणजे जागतिक तेल बाजारावर आपली पकड मिळावंने यासाठी ज्यामुळे जगातील प्रमुख देशातील सरकारनी हे केल की काय? असा प्रश्न समोर येतोय.
-
- या सर्व पोट प्रश्नांनी हे तर्क विकसित होताना आपल्याला दिसणार आहे.याबाबत सामुहिक विचार विनिमय केले जावू शकते.
चीनवरचा संशय अधिक गडद होणार.
यापेक्षा थोडा वेगळा विचार केला तर चीन ने संपुर्ण जगावर अधीराज्य गाजविण्यासाठी हा सर्व जीवघेणा जैविक युद्धाचा मार्ग अवलंबला आहे का ? या एकतर्फी आरोपाला सध्याच्या त्यांच्या येथील मयताच्या लपवलेल्या आकडेवारीने पुष्टी मिळते. दुसरे म्हणजे यापूर्वीचे याच प्रकारे मानवी जीवन धोक्यात टाकणारे सर्व संसर्ग तिथुनच जगात आले. हे तर जगाने अनुभवले आहे. अगदी कोरोनाच हे संकट ही याच मालिकेचाच एक भाग आहे.
आम्ही चुकलोय का ?
आता आपण गेल्या महिना भराचा घटनाक्रम बघितला तर काही द्विधा स्पष्टपणे समोर आल्या,यातुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशात भय पसरवण्यात येत आहे.याकडे सरकारने जाणिव पूर्वक दुर्लक्ष केले. प्रवासी भारतीय समाजात मिसळले नसते तर हा संसर्ग शेवटच्या नागरीकापर्यंत पोहचला नसता.तो पसरू लागताच कुठलीही दिशा,उपाय,पर्याय यावर काम न करता टाळेबंदी लागू केली.
प्रशाकीय विसंवाद हा मजुरांच्या व मध्यमवर्गीयांच्या मुळावर उठला.
ज्यांच्याकडे क्षमता होती अशां कुटुंबानी महिना दोन महिने पुरेल इतका किराणा भरला.एक सिलेंडर अगावू भरुन घेतले.अशा कुटुंबाकडे बहुदा सर्व सदस्याकडे एन्रोईड फोन आहेत. त्या कुटुंबाने पहिल्या टाळेबंदी कशी घालवायची याचे नियोजन केले.त्यानूसार त्यांची दिनचर्या थोडी उशिराने सुरू होवू लागली.याच वेळी समाजाची दुसरी बाजू ही प्रवासी मजुरांची जे एका दहा बाय दहा मध्ये सहा सात जन रहातात असे देशभर अंदाजे दोन तीन कोटी लोक या टाळेबंदीत अडकले.याशिवाय लाखो प्रवासी मजुर हे आपल्या गावी जायला पायी निघाले.या सर्वंचा विचार आमच्या प्रशासनाने केला नाही.हे त्यांच्या पायी दरमजल करण्याने उघड झाले.या दिवसात एकतरी बातमी वाचनात आली की या तरुणाने चारशे की मी अंतर पायी कापले.या वृद्धांन दोनशे की मी अंतर विना अन्न पानी कापले.दहा की मी अंतर पायी चालून दमलेल्या चिमुरड्याच्या आई चे पाय धरल्याच्या फोटोने लाखो लोकांचे डोळे पाणावले होते.हे सर्व प्रशासनाचे अपयशाचे पुरावे आहेत. तर भुकेने व्याकुळ झालेले प्रवासी मजुरानी टाळेबंदी वाढताच घरचा रस्ता धरायची तयारी केली हा ही सरकार व प्रशासन यांच्यातील वेळकाढू व गलथानपणाचा प्रकार आहे.पण दुर्दैवाने आमच्या कायद्यात सरकारी यंत्रणेचे कर्तव्य कसुरला कुठेही शिक्षेची तरतूदच नाही.कदाचीत याच कारणानी आमची प्रशासकीय यंत्रणा या सुस्तवलेल्या व बेडर,असवेदंशील झालेल्या आहेत.त्याना आपल्या निष्काळजीपणाचा आपल्या पगार व नोकरीवर होणार नाही याची शास्वती या मंडळीला आहे.
चीनची सारवासारव विश्वासघातकीच
आजच चीनने या विषाणु संसर्गाने मरणारांचा आकडा दुप्पट झाल्याचे जाहिर केले यामुळही जगात चीन विषयी आणखीच संशय वाढला आहे.तर अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटन संस्थेची आर्थिक मदत थांबविली आहे.याचे कारण म्हणजे या संसर्गाबाबत माहिती लपविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.