आजवर पैश्याच्या जोरावर केलेल्या वेडेपणाचे आत्मचींतन करा 

टाळेबंदी म्हणजेच लॉकडावुन संपला कि या कालावधीत आपल्या स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण आपल्या भाषेत लिहा. यातुन तुमच्या समोर काही अस्वस्थ करणारे सत्य येतील.त्यातल पहिल सत्य हे असेल या दिवसात तुम्हाला कुठलाही शारिरीक त्रास उद्भवला नाही. एरवी तुमची साखर वाढत होती.ती या कालावधीत अगदी बरोबर होती.नियंत्रणात होती.दूसरा तुमचा रक्तदाब या दिवसात व्यवस्थीत होता.अगदी एखादे दिवशी गोळी घेतली नाही तरी काही फरक पडला नाही.ज्यासाठी तुम्ही अनेक वर्ष आपण देवमाणुस म्हणून ज्यांच्याकडे जात व ते सांगतील तसे फॉलोअप साठी जात होतो. या खाजगी डॉक्टर मंडळींनी आज तुमच्याकडे पाठ फिरवली.तरीही तुम्ही स्वस्थ आहात.अन जेव्हा केव्हा अचानक या डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली तेव्हा हा मंडळींनी घरातून डॉक्टर नाहीत म्हणून सांगून तुम्हांला उपचार देणे टाळले.हा अनुभव जवळपास सर्व नागरिकांना आलाय.

या मागच्या जीवनात तुमच्या जिव्हाळ्याचा मित्र म्हणजे तुमचा फमिली डॉक्टर याच्या कडे पाठ फिरवून तुम्ही स्पेशालिस्ट कडे जायला व त्याच्या सांगण्यावर जीवन जगू लागले होते.त्याने प्रत्येक वेळी तुम्ही गेले कि कमीत कमी पाचशे तर ज्यास्तीत ज्यास्त कितिही पैसे घेतले जात होते.त्या टेस्ट करण्याची जराही गरज या दिवसात पडली नाही.अहो,पित्त झाल्याने ,अपचन झाल्याने तुम्ही यांच्याकडे गेले तेव्हा यांनी आपल्या दवाखान्यातील रूम भरलेली नाही,किंवा यांच्या सामूहिक आई सी यु मध्ये बेड रिकामा आहे यासाठी शिकार आली असे समजून लगेच ईसीजी काढून तुम्हाला थोड्या वेळात हार्ट अटेक येईल असे सांगून आपल्याकडून भीती दाखविण्याचे पैसे उकळले आहेत.आज वर कोट्यवधी रुपये कमावून बसलेले हे देवमानस आज आपलं कर्तव्य विसरले. पैश्यांच्या जोरावर सरकारचे आदेश धुडकावून लावले.अर्थात सरकार यांच्या पुढे हतबल झालेलं जनतेने अनुभवलं.

खाजगी डॉक्टर मंडळीला एक साधा सरळ प्रश्न

माझा या ज्ञानी,निष्णात,देवमाणूस खाजगी डॉक्टर मंडळीला एक प्रश्न आहे. त्याचे चिंतां तुम्हीही करा ,अन कुणी डॉक्टर मला उत्तर देऊ इच्छित असेल त्याचे स्वागत आहे.माझा प्रश्न … अगदी २२ मार्च पर्यंत तुम्ही लोकांच्या घश्यात बॅटरी मारून त्याला झालेले इन्फेकशन तपासलं होत ,त्या वेळी तुम्हाला हा पेशंट कोरोनाचा नाही याची खात्री कोणी दिली होती ? वा २३ मार्च नंतर प्रत्येक आजारी व्यक्ती हि कोरोनाची पेशंट आहे,अन त्याला पी पी इ किती शिवाय तपासले तर लगेच संसर्ग होईल असा आदेश कोणी दिला होता ? वास्तविक पाहता कोरोना आमच्या भारतात जानेवारी महिन्यातच आला होता.व २३ मार्च पर्यंत आमच्या देशात काही लाख लोक विदेशातून भारतात आले होते. त्यामुळे खाजगी डॉक्टर मंडळींनी या आजाराचा बाऊ केला व लोकांना कोरोना सोडून इतर आजारासाठीचे उपचार नाकारला हि कृती अमानवीय होती. याचा विसर कधीही पडणार नाही.हि ऐतिहासिक नोंद असणार आहे .  

सरकारने व समाजाने याबाबत गंभीरतेने विचार करायला हवा

आपण आपल्या फमिली डॉक्टरला बायपास करुन एम डी,एम एस कडे जावू लागलो तस तसे लुटले जात होतो हे या काळात लक्ष्यात आल असेल.कारण तुम्ही किरकोळ तक्रार घेवुन गेले तरी तुम्हाला दोन दिवस ऐडमिट करुन घेतले जात होते.तुमच्या कडून गरज नसलेल्या रक्ताच्या चाचण्याकरुन घेतल्या जात होत्या.त्यांची खरच गरज होती का ? किवा आमचा फमिली डॉक्टर टेस्ट न करता आमच्या रोगाचे निदान करु शकतो.तर त्यांच्या पेक्षा ज्यास्त शिकलेल हे खाजगी डॉक्टर का? करु शकत नाही.किंबहुना सरकारी दवाखान्यात यांच्या इतकेच शिकलेले डॉक्टर किती तरी सध्या सध्या औषधाने आपल्याला बरे करतात.ते कसे ? याचा विचार केला तर आपण मूर्ख बनत आलोय हे मान्य करावे लागेल .आपल्याला खुप पैसा मिळतोय या अविर्भावात जीवन जगतांना लोकांचा जीव वाचविण्याच्या पवित्र व मानवतेच्या कार्याला या निती सोडून जगण्याच्या मार्गावर आपल्या अज्ञानाने व श्रीमंतीने नेवून उभे केले आहे ,अशा परिस्थितीतही आपल्या शेकडो खाजगी व लाखो सरकारी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरु ठेवली.त्यांच्या या कार्याला सलाम .

तरीही खाजगी डॉक्टर व याबाबतच सरकारी धोरण याच आत्मचींतन करण्याची ही वेळ आहे.ते आज जर नाही केलं व योग्य ती पावले नाही उचलली तर भविष्यात पुन्हा असे संकट ओढवले तर हि मंडळी लोकांचे जीव जाताना बघून दार लावून घेतील याबाबत सरकारने गंभीर व्हावे हिच अपेक्षा आहे .

ClearCut N95 Face Mask, Reusable, washable & CE certified to protect Mouth droplets, Dust and pollution, Colour may vary currently White, Pack of 5 mask

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *