madhav ojhamadhav ojha

 लस घ्यायची आहे,हे वाचा.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना महामारीत होरपळून निघत आहे . शतक नंतर आलेल्या या महामारीने जगातील मानवी जीवन अस्तव्यस्त करून टाकले आहे. भावनिक,व्यावहारिक नात्यांची गोडी ,जिव्हाळा संपुष्ठात आणला आहे. हे सर्व माणसाच्याच उन्मत्ततेचे परिणाम आहेत. एव्हढ्या मोठ्या आघातानंतरही आमच्यात सुधारणा झालेली नाही.एकीकडे सरकार अगदी ठरवून लोकांना भयभीत करत आहेत. दुसरीकडे लोकांची सहनशीलता पोटापुढे असहाय्य झाली आहे.
अशा या भयंकर संकटातून वाचण्याचा एक उपाय सध्यातरी लसीकरण हाच दिसत आहे.तो शास्त्रीय परिपूर्ण असेल असे काहीं नाही. तरीही कोरोनाची जीवघेणी आपल्यावर येऊ नये असे प्रत्येकाला वाटते आहे. सध्या आपल्या देशात दोन लसी उपलब्ध आहेत. एक कोविशील्ड दुसरी कोव्हॅक्सिन याचे दोन डोस प्रत्येकाला घ्यायचे आहे. पण त्यासाठी वयाची अट घालण्यात आली. आता ती शिथिल केली गेली आहे. त्यामुळे आता १८ वर्ष वयाच्या पुढील सर्वाना ती घ्यायची आहे. या दोन डोस मधील अंतराबाबत संभ्रम आहे. त्यात बदल होत आहे.त्याची माहिती लोकांना सहज व अचूक मिळत नसल्याने संभ्रम वाढत आहेत. तरीही अगदी अलीकडच्या संशोधन व सर्वे नुसार या दोनही लसी घेण्यात किमान दोन महिने अंतर जरी असले तरी चालणार आहे. हेच सिद्ध झाले आहे. तेव्हा अजिबात गडबड गोंधळ करून घेऊ नका. अगदी एक डोस घेतल्यानेही सुरक्षितता हि मिळणारच आहे. दुसरा डोस हा बुस्टर डोस आहे. पाहिल्याची परिणाम कारकता कमी होऊ नये यासाठी तो घ्यावा लागणार आहे. कदाचित असे बुस्टर डोस अनेक वेळाही घ्यावे लागू शकतात.ते येणारे काळात समोर येईलच. 

कशी आणि कुठे कराल लसीसाठी नोंदणी  

 https://www.cowin.gov.in/home .

आपल्या देशात कोरोना लसीकरण करण्यासाठी सरकारनेहे संकेतस्थळ विकसित केले आहे. याची मोबाईल एप ही विकसित केली आहे. यावर जाऊन आपण आपल्या गावच्या पिनकोड ने कोणत्या दिवशी किती लस शिल्लक आहे,हे पाहून आपली नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला आधार नंबरची किंवा तुमचा पत्ता फोटो असलेल्या अन्य कुठल्याही एका सरकारी पुराव्याची गरज आहे. त्याशिवाय आपल्या मोबाईल नंबर वर आपली नोंदणी झाली याचा संदेश प्राप्त होतो. एकाच मोबाईल नम्बर वर एकाच वेळेला आपण घरातील चार सदस्यांची नोंदणी करू शकता. याची माहिती आपण खालील लिंकवर जाऊन घेऊ शकता. 


अंमलबजावणी आणि घोषणा अत्यंत विपरीत 

या कोरोना संकटात अगदी सुरुवातीपासून देशातली सर्व सरकार गोंधळलेली आहे.दिल्ली,गोवा,केरळ हि दोन तीन राज्य याला अपवाद आहे. त्यांनी पहिल्या लाटेतच कोरोनाला पायबंद घालण्यासाठी चांगली कृती केली. चूक काय झाली कि ,केंद्रासह आमची सरकार स्वतःच असं कुठलंच धोरण राबवायला तयारच दिसली नाही.प्रत्येकाने एक दुसऱ्यावर जबाबदारी ढकलण्यात पुरुषार्थ गाजवला. आणि सर्व चुकत गेलं. कुठची नेमकी अचूक माहिती सहज करता येण्याजोगे सुरक्षा उपाय हे ठामपणे सांगता आले नाही. हे सरकारच सपशेल अपयश आहे. वर्षभरांनंतरही तोच कित्ता गिरवण्याचे काम सुरूच आहे. लस आली ,निर्मित आमच्या देशात झाली. पण ती घेऊ कि नको यावर ठाम मत नाही. कासवगतीने काम करणारी आमची सरकारी यंत्रणा याही वेळेला गोंधळ घालायला मागे राहिली नाही. परिणामी संपूर्ण लसीकरण विस्कळीत झाले नाही तर केले गेले. केंद्राने सर्वाना मोफत लस मिळणार सांगून आपली कॉलर ताट करून घेतली. व निवडणूक काढून घेतली. प्रत्यक्ष १५७ रुपयात प्रति मानसी मिळणारी लस सुरुवातील २५० रुपयांना खाजगीत विकायला लावली. आणि मग तो फाजील मुद्दा चर्चेला टाकलं. राज्याने कशी घ्यायची ,केंद्राने किती घ्यायची. हे फाजील जबाबदारी ढकलण्याचे हीन राजकारण खेळून झाले. व आदर पुनावाला यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत १५७ रुपये हि किंमत नफ्यासह असल्याचे सांगितल्याने त्यांच्यासह सर्व तोंडावर पडले. लस कुठेही मिळेल हो घोषणा केंद्राने केली. अन देशभरात किती लसीकरण केंद्र तर म्हणे १९६०० एव्हढ्या तुटपुंज्या संख्येने सुमारे शंभर कोटीचे लसीकरण कसे करणार ? हा प्रश्न सहा अंकी पगार घेणारांनी स्वतःला विचारायला हवा होता. परिणाम जे व्हायचे तेच झाले संपूर्ण लसीकरण कोलमडले.
https://www.youtube.com/watch?v=CK6Wwyt7NlE&t=37s 
 

चांगली रचना का व कशी कोलमडली 

सरकारने लस घेण्यासाठी सुरु केलेल्या या संकेतस्थळावर  https://www.cowin.gov.in/home .

नाव नोंदणी हि अत्यंत योग्य अशी सुरु होती. त्याने कुठल्या केंद्रावर किती लस पुरवायची याची कल्पना सरकारला वितरकाला सहज मिळणार होती . यासोबतच नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार ठरलेल्या वेळेत लस घेण्यासाठी जावून लस घेणे शक्य होणार होते. त्यादृष्टीने सुरुवातही झाली.लोकांनी नाव नोंदविली. ज्यांना ते शक्य नव्हते त्यांना आरोग्य कर्मचारी,गावातील सामाजिक कार्यकर्ते हे मदत करायला लागले होते. पण लसीकरणासाठी लस उपलब्ध करून देण्यात यंत्रणेला अडचणी आल्या अन विस्कळीतपणाला सुरुवात झाली. यातून एकीकडे वर नमूद संकेत स्थळावर अगदी आठवड्यातील सर्व दिवस लसीकरण सुरु असल्याचे टाइम स्लॉट मिळत होते. प्रत्यक्ष लस उपलब्धच नाही. अशी अवस्था झाली.यात राज्य मंत्र्यांसह ,गाव पुढाऱ्यानी ऑनलाईन व्यवस्था हि ऑफलाईन करण्यासाठी पुढाकार घेतला पण लास उपलब्ध होई पर्यंत हि रचना थांबवायला लावली नाही. किंवा लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले नाही. या गलथान कारभारामुळे ज्यांनी रीतसर सरकार वर विश्वास ठेवून ऑनलाईन नोंदणी केली ,तेच आज लस घेण्यापासून वंचित आहेत. कारण गाव पुढाऱ्यानी जी ऑफलाईन व्यवस्था निर्माण केली ती तर्कसंगत नाही. त्यात लोकांनी भल्यापहाटे उठून लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करायची. टोकन घ्यायचे आणि तिथेच ताटकळत बसायचे मग दहा वाजेल लसीकरण सुरु , यात नाव चारशे आणि लस दोनशे डोस असा सर्व सावळा गोंधळ सुरु झाला. दुसऱ्या लाटेने लसीच चांगलं मार्केटिंग केलं. त्यासाठी अनेकांचे उपचाराशिवाय बळी गेले, म्हणून आता लस प्रत्येकाला सर्वांच्या आधी हवी आहे. या ऑफलाईन व्यवस्थेमुळे सरकारला हे कळणार नाही कि लोक नाव नोंदणी करून लस का घेत नाहीत ? व ऐन वेळेला लोक आपली नाव कसे नोंदवत आहे ? यातून कुठल्या केंद्रावर किती लस दिली जाऊ शकते याचा अंदाज घेणे शक्य होणार नाही. आता तुम्हीच ठरवा तुम्ही अवलंबलेला ऑफलाईन  मार्ग योग्य आहे कि अयोग्य ते . सकाळी लवकर येऊन उपाशी बसून एखाद्याने लस घेतली आणि त्याच काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी हि रचना निर्माण करणारे घेणार का ? 

काय केलं जावू शकत 

सर्व प्रथम एक आठवडा संपूर्ण लसीकरण थांबवणे. त्यांत प्रत्येक केंद्रावर किमान तीन दिवस लसीकरणं पूर्णवेळ लस उपलब्ध करून देणे. यात पहिलादिवस हा ज्यांचा दुसरा डोस देणे बाकी आहे. त्यांना देऊन ते काम पूर्ण करावे. दुसरा दिवस हा ७० टक्के ऑनलाईन नोंदणी केलेल्या व ३० टक्के ऑफलाईन म्हणजे अशिक्षित सामान्य लोकांना द्यावी. तिसरा दिवस सर्व नोंदणी कृत १८ वर्षाच्या पुढील असे साधारण दोन आठवडे करावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे .तसेच नोंदणीसाठी निवासाचा पत्ता जो वापरला आहे त्याच पाट्यावर लास उपलब्ध करून देणे गरजेचे आहे .याशिवाय खाजगी लसीकरण केंद्रांना मोठ्या प्रमाणावर परवानगी देणे गरजेचे आहे.सध्या जी योजना ऑफलाईन वाटते यात विस्कळीतपणा व गोंधळ निर्माण केला जात आहे. विनाकारण आरोग्य यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप होत असल्याने आणखीच गोंधळ निर्माण केला आहे. तो त्वरित थांबवणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता सरकारी संकेतस्थळावर केलेली रचना अत्यंत सुंदर आहे. त्यातून आपल्या सोयीने आपल्याला ठरवलेल्या वेळेत जाऊन लस घेता येणार आहे.  तेव्हा तुम्हीच ठरवा तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे कि अयोग्य . 

प्रत्येकाने आपल्या सोबत दोन अशिक्षित ,गरिबांचे नाव नोंदणी करून दिली तरी आपण देशासाठी व आपल्या समाजासाठी काम करू शकतो . विनाकारण देश सेवा व समाजसेवा करण्याच्या उद्द्येशाने चांगली रचना खराब करणे थांबवा.आपण निवडेल मार्ग हा गोंधळ निर्माण करणारा आहे. सर्वात महत्वाचे लस उपलब्ध होई पर्यंतच या अडचणी आहेत. येत्या काही दिवसात हे सर्व सुरळीत होईल जर आपण सरकारने केलेली रचना मोडीत काढली नाही तर ते सह आणि सोपे होणार आहे .  

 

0 thoughts on “लस घ्यायची आहे हे वाचा / insufficient vaccine is create panic”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *