गुढी पाडवा आणि आरोग्य .

भारतीय सांस्कृतिक वर्षारंभ म्हणजे गुढी पाडवा. या गुढी पाडव्याची आरोग्यदायी सुरुवात होते. ती कशी तर या दिवशी अर्थात या दिवसात कडुलिंबाच्या झाडाला नवी पालवी फुटते. फुल येतात . या दोनही वस्तू तुम्हाला अनेक रोगापासून मुक्त करण्यास समर्थ आहेत .
म्हणुणच या दिवशी एक अष्टक बनवले जाते. त्या हे आठ घटक येतात. कडुलिंबाची फुल , पान, जिरे ,मिरे .हिंग ,अजवाईन , मीठ आणि गूळ या आठ वस्तू एकत्र करून वाटून घ्याव्या व सकाळी उपाशी पोटी अगदी थोडेसे म्हणजेच दोन शेगदाणे किंवा हरबरा एव्हढ्या गोळी बनवून खावी .
महिनाभर हे उपाशी पोटी खाल्याने आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. मुख्यत्वे करून यामुळे आपल्या शरीरात कँसर सारख्या दुर्धर आजाराचे अपरिपकव सेल्स निर्मिती होत नाही .
तस पाहता चैत्र महिण्याला उत्तर भारतात मधुमास असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे या महिन्यात आपली रक्तातली साखर वाढलेली असते. त्यामुळेही या अष्टकाचे सेवन हे आपल्याला आरोग्यदायी असेच आहे.भारतीय सांस्कृतिक प्रत्येकाचे सणावारांचे आरोग्यदायी असे महत्व आहे .

हे कसे खायचे ? तर या सर्व आठ वस्तू एकत्र करून वाटून किंवा मिक्सर मध्ये एकत्र करून घ्या . त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून आपल्या आवडी नुसार पण एक ,दोन गोळ्या उपाशी पोटी खाव्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *