महामारीने जमिनीवर आणले
कोरोना महामारीने आपल्या जीवनाची दिशा बदलली. विचारशक्ती ,जीवनशैली बदलली. जणू काही नवा जन्मच आहे. दृष्टी अधिक स्पष्ट झाली. जीवनाची नेमकी काय गरज आहे याच ज्ञान आलं किंवा त्यात वाढ झाली म्हणा. अलीकडच्या दशकात आपण आपल्यापासूनच दुरावलो होतो. ते आपण आपल्यात डोकावू लागलो. हा या महामारीचा फायदा आहे. सारखं पैशाच्यामागे वाहवत चाललो होतो. जितके वाहवत होतो. तितका तो आपल्यापासून दुरावत होता. पण गेल्या वर्ष दिड वर्षात पैसे किती प्रभाव शून्य आहे. याची जाणीव झाली. जे प्रचंड धनिक म्हणून ज्यांच्या कडे आपण पाहत होतो.त्यांचा जीव पैसे वाचवू शकला नाही. हे पूर्वीही होत ,पण आता ज्यास्त अधोरेखित झालं. भय इतकं मोठं होत कि,एकाच वेळी घरातील अनेकांचे जीव गेले.तरीही आपण वाचलो आहोत.यापुढे हे सर्व दुःख या परिस्थिती पुरत तरी हलकच आहे.अशीच भावना जनमानसात रूढ झाली. जीवन जगण्याच्या गरज किती छोट्या व सीमित आहे, याची व्याख्या निश्चित करण्यात या महामारीने प्रचंड मोठी भूमिका निभावली आहे. त्यासोबतच आपले आपल्यातून हिरावले ,ते कधीही परत न येण्याच्या प्रवासाला निघून गेले. या यातना नक्कीच आयुष्यभर पुरणाऱ्या आहेत.याची जबाबदारी आपण म्हणजे मानवानेच घ्यावी लागेल. कारण हे पाप मानवनिर्मितच आहे.प्रचंड पैसे व सत्तेचा उन्माद हा किती नरसंहाराक ठरू शकतो त्याचं हे उदाहरण आहे.
ज्यांना बुद्धिजीवी समजतो तेच संभ्रमित दिसले
या महमारीने अनेक प्रश्न समोर उभे ठाकले.त्याकडे उघड्या डोळ्यांनी पहात नव्या वाटा विकसित करने हे महत्वाचे आहे.त्यादृष्टीने अजुन तरी आपण वाटचाल करीत आहोत असे काही दिसत नाही. या उलट महामारीला संधी समजुन लोक विपरीत मार्गाला जाताना दिसत आहे.जे बुद्धिजीवी मानले जातात त्या क्षेत्राकडे बारकाईने पाहिलं तर ते सपशेल नापास झाले आहे. त्याची अवस्था अत्यंत गोंधळलेली ,संभ्रमित ,तर्कशून्य अशी दिसली आहे.यात तुम्ही सनदी अधिकारी ,शिक्षण ,वैद्यकीय या सर्व व्यवस्थापनाच निरीक्षण केलं तर आपण एका निष्कर्षावर येऊन थांबतो ते म्हणजे या सर्वांची विद्वत्ता हि अत्यंत सीमित विचार करणारी ठरली आहे. आपण यांच्या ज्ञानाची व व्यवस्थापनाचे या कालावधीतील निरीक्षण केले तर खूप काही समोर आले आहे. ज्याने आम्ही जमिनीवर येणे अपेक्षित आहे. व कोरोनाला एक संधी समजून प्रचंड बदल करणे व देश हिताचे कठोर निर्णय घेण्याची हि वेळ आहे.तरच आपण पुन्हा नव्याने उभे राहू हे सत्य स्वीकारणे गरजेचे आहे.
शिक्षण क्षेत्र
याच उदाहरण द्यायच झाल तर शिक्षण क्षेत्रात फक्त ऑनलाईन क्लास एव्हढाच पर्याय समोर आला आहे. त्याचा फायद्या ऐवजी नुकसानच होत असल्याचे अनुभवाला येत आहे.वास्तविक पाहता आमच्याकडे शिक्षकांची कुठलीच कमतरता नाहीय. लाखो शिक्षक प्रत्येक राज्यात बेरोजगारीने पीडित आहेत. याशिवाय ज्या विषयात प्राविण्य आहे,तो विषय सोडून सर्व विषय त्या शिक्षकाला शिकवायला दिले जातात हि शोकांतिका आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील अधोगती हि दिवसागणिक वाढली आहे. या दीड दोन वर्षात या शिक्षण पद्धतीचा फायदा कमी व नुकसानच ज्यास्त झाले आहे. हजारो मुलांना चष्मे लावावे लागले आहे. काही हजार मुले हि पाढे ,जोडाक्षर ,वाचन ,लेखन विसरली आहेत,एव्हढाच काय तर खेळ विसरली आहेत.यासर्वांचे खापर याच क्षेत्रावर फोडले जाऊ शकते. हा दोष याच बुद्धिजीवींचा आहे.ज्यांनी अन्य मार्ग पर्याय निवडलाच नाही. अन जे निवडले ते सर्व फक्त कागदावरच दिसले. दोन वर्षानंतर आजकडे पहिले असता एकच ठामपणे सांगता येऊ शकते. आमची शिक्षण पद्धती हि कुचकामी ठरलीय. जी पायाभूत शिक्षणहि पुरवूं शकत नाही.