जगावर कोरोनाच संकट ओढवलं. आपण घरात बंदिस्त झालो. देवही पुजाऱ्यापुरते मर्यादित झाले. हि अवस्था सतरा मार्च पासून होती.तब्बल आठ महिन्यांनी भक्तासाठी देवाची दारे उघडली. पण शर्ती अटींनी बांधलेली.काय आहेत या अटी सविस्तर बघायला वेळ नाही. पण ठळक अटी नियम असे आहेत.
१. वय वर्ष १० च्या आतल्या मुलांना मंदिरात प्रवेश नाही.
२. वय वर्ष ६० च्या पुढे यांनाही मंदिरात प्रवेश नाही.
३. दर्शनाला येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करावा लागेल दर्शन तिकीट सशुल्क किंवा मोफत.
४. येताना मास्क अनिवार्य असेल.
या मुख्य अटी शर्ती आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येताना.
साईबाबा संस्थांनच्या अधिकृत संकेत स्थळ ( वेबसाईट ) वर बुकिंग करून शिर्डीला या. म्हणजे आपली गैरसोय होणार नाही. या वेबसाईट वर मोफत व सशुल्क दर्शन ,आरती चे पास घेऊ शकता. तसेच याच ठिकाणी घरी बसुन साईबाबा संस्थानला देणगी देऊ शकता. साईबाबांच्या साहित्य डाऊनलोड करू शकता.देणगी देताना आपला पत्ता दिल्यास आपल्याला साईबाबाची उदी घरी पाठवली जाते.