वेब साईट साठीचे होस्टिंग व सर्वर कुठे मिळते ?
आधुनिक संगणक युगात आपल्याला आपली संगणकीय ओळख अत्यंत गरजेची झाली आहे. मग ती वयक्तीक असो कि व्यावसायिक. यासाठी आपला कुठलातरी सांकेत पत्ता हा अनिवार्य आहे. म्हणजेच आपला किमान इमेल तरी असायलाच हवा. त्याशिवाय आपण कुठलाही बोटाने स्क्रीन सरकाविण्याचा म्हणजेच अंरॉईड फोन सुरु करू शकत नाही.हे वयक्तिक जीवनशैलीच बंधन झालं.
वेब होस्टिंग काय आहे ?
आता आपण व्यावसायिक विचार करू,यासाठी तुम्हांला मोबाईल,कॉम्पुटर वापरता येणे गरजेचे आहे. अर्थात जे कष्टकरी लोक आहेत त्यांना याच्याशी काही देणंघेणं नाही.त्यांची ती गरजही नाही.आपल्याला जर आपला व्यवसाय जागतिक पातळीवर नेवून त्यात एक उंची गाठायची आहे. तर संगणकीय ज्ञान अत्यंत गरजेचे आहे. मग तुम्हाला मोबाईल व संगणक हे सहजतेने चालविता आलेच पाहिजे. याशिवाय तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी एक साजेसे नावाची ओळख निर्माण करावी लागेल. त्याला डोमेन असे म्हटले जाते. हे विकत घेऊन पुढे काय करायचे यासाठी आजचा हा लेख आहे. मागील भागात आपण हे पाहिलं होत कि वेब साईट कशी बनवायची .त्यासाठी डोमेन खरेदीच्या लिंक त्यात दिल्या होत्या.
कुठे आणि कसे मिळेल होस्टिंग आणि सर्वर
आज ते डोमेन म्हणजेच आपल्या वेब साईटचा पत्ता व त्यावरील सर्व माहिती कुठे कशी जमा करता येईल याची माहिती देतो. आपल्या वेब साईट वर असलेली आपल्या दुकांची माहिती त्यात विकले जाणाऱ्या वस्तूचा तपशील ,कोणत्या वस्तूवर काय सूट आहे,कोणत्या वस्तूची काय किंमत आहे . त्या आपण ग्राहकाला कश्या पाठवू शकतो अशा अनेक प्रकारची माहिती हि रोज अद्ययावत करावी लागेल शिवाय साठवून ठेवावी लागेल. यासाठी ज्याच्या गरज असते त्याला वेब होस्टिंग व सर्वर म्हटले जाते.त्यात अनेक प्रकार आहे. त्याची माहिती हि अनुभवाने येते. यालेखात वर बिगरॉक या वेब होस्टिंग ,सर्वर, डोमेन प्रोव्हायडर ची लिंक दिल्याहेत यांच्या मदतीने तुम्ही या पर्यंत पोहचू शकता व आपल्या गरजेनुसार होस्टिंगचे प्लॅन निवडू शकता.
           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *