“नॉवेल कोरोना” जीव घेणे वैश्वीक संकट
ज्याने संपूर्ण जगाचे सार्वजनिक ,सामाजिक,आर्थिक,वैयक्तिक,धार्मिक, दैनंदिन जीवन धोक्यात टाकले.असा “नॉवेल कोरोना ” वायरस जगात महामारी पसरली. यानिमित्ताने लोक घरात बसले. देव देवळात कैद झाले. ज्यांना कळतंय कि परिणाम काय होणार त्यांचा जीव रस्ताळतोय पण इलाज नाही. ज्यांना काळात नाही,क्षणिक आनंद उपभोगत आहेत.व सरकारच्या सर्व सूचनांकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत.याच मुखपणामुळे हजारो,लाखो भारतीयांचे जीव जाणार आहेत.याची यत्किंचितही कल्पना या बेदरकार मंडळींना नाही.
काय आहे “नॉवेल कोरोना ” ?
एक सर्दी पडसे होतो तसाच विषाणू . पण जो अंगाने गोलाकार आहे. एखाद्या मुगुट सारखा आहे ,म्हणून याला “कॉरोना ” म्हणायचं,याच जागतिक आरोग्य संघटनेने “नॉवेल कॉरोना “हे नाव ठेवलय. याचा जन्म चीनमध्ये डीसें २०१९ मध्ये झाला. म्हणून याला कॉवीड १९ म्हणायचं. याची जनुकीय रचना ही बदल केलेली वा करणारी आहे. यामुळे यावर ताबडतोब औषध सापडण्याची शक्यता कमी आहे.वास्तविक पाहता जनावरांमध्ये असणारा हा विषाणू माणसात कसा सक्रिय झाला ? त्याचे माध्यम काय आहे ? याबाबत कुठला शोध लागत नाही. किंवा तो लागण्याआधीच हा व्हायरस आपला जनुकीय रचना बदलतो यामुळे असे संशोधन हाती लागणे कठीण आहे.यावर उपायांच्या शोधासाठी भारतासह अमेरिकेपर्यंतचे सर्व देश कार्य करीत आहेत.तस पाहता या व्हायरस ज्या जनुकीय बदलाचे विज्ञान चीनने बऱ्यापैकी विकसित केले आहे असे म्हणणे चुकीचे ठरू नये.कारण गेल्या दोन तीन दशकात जगाला जेरीस वा वेठीस धरणारे व्हायरसचा प्रसार हा चीन मधूनच झालेला आहे. हे ठोसपणे सांगितलं येईल. त्याला थोडे इतिहासात गेले तर लक्ष्यात येते कि २००३ मध्ये सार्स नावाचा व्हायरस आला. तो चीन मार्फतच आला. तेव्हापासून मार्स,अँथ्रेक्स ,निपाह ,स्वाईन फ्लू .एन १ एच २,आता नॉवेल कोरोना हे सर्व चीन मधूनच जगात आले.याच्या खोलात गेले तर चीन जगाबरोबर जैविक युद्धाची तयारी करत आहे. त्याच्या प्राथमिक चाचणीत अशी महामारी पसरली आहे.तर प्रत्यक्ष युद्धाने जगातील मानव जमात नष्ट होईल अशी भीती या निमित्ताने का व्यक्त करू नये. आणि या विनाशाकरीता लागणारी आर्थिक शक्ती जगभरातील या सर्व देशानी पुरवली आहे. कि जे आज “नॉवेल कोरोना‘ मुळे आपले अस्तित नष्ट होताना पाहताय.
कुठे किती परिणाम केला या नॉवेल कोरोना ने ?
आज ज्या १८५ ते १९० देशात “नॉवेल कोरोना ” जण माणसांचा यमदूत बनला आहे. मृत्यूच तांडव करतोय त्याच देशवासीयांनी चीनच्या उत्पादनाला म्हणजेच घड्याळाच्या सेल पासून ते सेक्स ‘डोल पर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक व चायना फळापासून ते घरातील फर्निचर पर्यंत खाण्यापिण्याच्या खाद्यासह मानवी गरजेच्या सर्व वस्तू विकत घेऊन ही शक्ती दिली आहे. आज मी हा लेख लिहितोय तोही चायनामेड मोबाईल,मोडेमच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविणार आहे.यात मी हि आपल्या सर्वाइतकाच दोषी आहे.पण माझा नाईलाज आहे. कारण माझ्या आज वरच्या सरकारांनी आमच्या शंभर कोटी जनतेचा ऊर्जा म्हणून कधी उपयोगाचं करून घेतला नाही.ही जनता वाढणारी लोकसंख्या आपली राज्य करण्याची संपत्ती आहे. यांच्याच जीवावर आपली सत्ता स्थापित करायची व तेच गलिच्छ राजकारण करून आपली घराणी श्रीमंत करायची,जनतेला वेठीस धरायचे.यासाठी आपली व आपल्या देशवासीयांची ऊर्जा या मंडळींनी वापरली आहे.या जनतेचा कुठलाही व्यावसायिक वा वैज्ञानिक विकासासाठी कधीच उपयोग करून घेतला नाही.परिणामी त्या दृष्टीने कुठलाच वैज्ञानिक विकास साधला गेला नाही.व वैश्विक बाजारात बुद्धी सोडली तर कुठली वस्तू आम्ही विकू शकलो नाही.हे राजकीय व प्रशासकीय मतलबी प्रवृत्तीचे जिवंत उदाहरण आहे.
सर्व विषाणू हे चीन मधूनच कसे पसरतात ?
२००३ पासून चीन सातत्याने नवनवीन जनुकीय बदल करून नवनवे व्हायरस जगभर पसरवतो आहे. ही गोष्ट आता गंभीरतेने घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अन याची सुरुवात एकट्या भारताने करावी यासाठी मी हा लेख लिहीत आहे.मला आज माझ्या देशात ” नॉवेल कोरोनाने “किती देशवासियांना कवेत घेतलं आहे हे नक्की सांगता येणार नाही. पण ज्यांना हा व्हायरस लक्ष्यात येतोय त्याचे परिणाम समोर दिसत आहेत .ते सर्व माझे बांधव दररोज मारून जगत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात यमदूत तांडव करीत आहे. या सर्वातून आजमितीला किती नागरिक आपला जीव गमावतील हे सांगणे व निश्चित करणें अश्यक्य आहे. लोकांना गांभीर्य नाही. कारण लोक या व्हायरॉलॉजी म्हणजेच विषाणू विज्ञान याबाबत आमच्या सरकारी यंत्रणेने जे करायला हवे ते प्रचारप्रसार शिक्षण सार्वजनिक व सुलभ मोफत करणे गरजेचे होते.आज जे लॉकडाऊन केलं जात आहे ते दहा दिवस आधी केले जाणे देश हिताचे ठरले असते. याशिवाय हवाई सीमेबाबत फक्त चीनवर लक्ष्य केंद्रित केले गेले अन दुबईतून येणारे भारतीयांना संसर्ग सापडला.याच माध्यमातून देशात संसर्ग पसरला.आता दिवसागणिक वाढणारा आकडा भीती दाखवतोय.नागरिकांचा जीव टांगणीला लावतोय.तरीही नागरिकांना कुठल गांभीर्य दिसत नाहीय.
या महामारीत चीन जगावर राज्य करण्याच्या डावात यशस्वी
आता या संकटातून भारतीय नागरिक सहीसलामत बाहेर पडो ही निसर्ग शक्तीला प्रार्थना आहे.या अनुभवाने एकट्या भारताने जरी चीन सोबतचे सर्व व्यवहार बंद करून आपल्या गरजेच्या व या उपद्रवाला उपाय करू शकतील अश्या संशोधनाची सुरुवात करणे गरजेचे आहे. चीनच्या या प्रयोगाने इटली,फ्रांस ,जर्मनी,इराणसह अमेरिकेला चांगलाच तडाखा बसला आहे.एकूणच अख्या जगाची आर्थिक व सामाजिक ,आरोग्य व सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या नॉवेल कोरोनाने युद्धाच्या व्याख्या बदलल्या आहेत. आज या संकटाला सत्तर हजार कोटींचे संरक्षण तरतुदी ऐवजी वैद्यकीय ज्ञानाची गरज उभी ठाकली आहे. मोठ्या आलिशान गाड्या पेक्षा स्वस्तात आरोग्य चाचण्या व व्हेंटिलेटर निर्मितीची आवश्यकता आहे.यावर संपूर्ण जगाने लक्ष्य केंद्रित कार्याला हवे आहे. अगदी मानवता विसरलेल्या औषध निर्माण व्यवस्थेने समाजासाठी दिवस रात्र एक करण्याची व्यवस्था निर्माण करावी.संपूर्ण जगाने जनुकीय व शस्त्र निर्मिती बंद करावी यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
आपले जगावर साम्राज्य असावे ,स्थापित करावे म्हणून असे जीव घेणे विज्ञान समस्त मानव जातीलाच नाही तर अवघ्या जीवश्रुष्टीला घातक आहे. हे या नॉवेल कोरोनाने समोर आले आहे. चीनने जगाची फसवणूक केली आहे.ही माफी योग्य नाही.
माधव ओझा ,पत्रकार ,शिर्डी /पुणतांबा
March 23, 2020, 7:05:35 PM
