सार्थ जीवनाचा प्रवास…
पाच सहा दिवसापासुन मन सैरभैर होतय.प्रत्येकाला आपली मुल देखणी,हुशार,सर्व आघाड्यावर पुढे असावी अस नेहमी वाटत असत.ते स्वभाविक आहे.या सर्व स्वप्न अपेक्षांमध्ये आम्ही कधी कल्पनाही करु शकत नाही.कि कुठली तरी शाररीक कमतरता असलेले मुलं सांभाळणारे आई बाबा काय व कसे स्वप्न पहात असतील? त्यांना इतरांची मुल बघुन किती यातना होत असतील ? शेवटी नियतीने अस का वागावं हा प्रश्न अनुत्तरीतच राहातो.ज्याच त्याच नशिब यावर बील फाडुन मोकळे होतो.पण ती संवेदना समजु शकत नाही.परवा बाल मैत्रिणीच्या घरी गेलो तेव्हा तिची वय वर्ष २८ असलेली मुलगी बघीतली.तिला जन्मापासुनच अंधत्व आलेल होत.तिच्या संगोपणात दोघांनी पराकाष्टा केली होती.पाण्यासारखा पैसा खर्च करुन मुलीला दिसाव हि स्वप्न पाहीली,पण देव निष्ठुरच राहीला.सर्वासाठी चांगल करावं ,लहान वयात नदीत बुडणारे मित्राचा जीव वाचविणारे बाबांच्या पोटच्या पोरीला जग दिसु नये.हे देव म्हणवणारे शक्तीच निष्ठुरत्वच आहे.तरीही ते दाम्पत्य आपल्या मुलीच्या आनंदासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील होते.तोंड भरुन कौतुक करीत होते.तिच्या गाण्याच्या आवडीबाबत तोंडभरुन सांगत होते.त्यासाठी भरपुर गाण्यांचे पेन ड्राईव,मोबाईल त्यांनी घेवुन ठेवले होते .
तिच्या बाबांनी आपल्या मुलीची म्हणजेच ' दर्शना ' हिची स्पेशालिटी सांगताना त्यांनी हिला सुमन कल्याणपुर व लता मंगेशकर यांच्या आवाजातला फरक सहज व अचुक कळतो . त्यांनी हे अभिमानाने सांगितले कारणही तसच आहे.तुमच्या माझ्या सारख्या डोळस लोकांना या दोन गायिकांच्या आवाजातला फरक सहजतेन कळु शकत नाही. हा अनुभव मला ही आला पाकिजा चित्रपटाचं गाणं तिथे सुरु होत. तिला विचारलं कोणत्या सिनेमाचं गाणं आहे. 'दर्शना' ने चटकन उत्तर दिले ," पाकिजा " अर्थात हे सर्व या बाईसाहेबांच्या "मूड' वर अवलंबून आहे. त्यांना वाटलं तर आपल्या प्रश्नच उत्तर देणे तिचा स्वभाव आहे.
|
श्री व सौ गिरीश देशपांडे आपल्या लाडकी दर्शना सोबत |
विशेष म्हणजे या ‘दर्शना’ बाईसाहेब दुपारी दररोज बरोबर चार वाजता चहा मागतात.ती वेळ चुकत नाही. सहा वाजता जेवण हा अनुभव माझ्या डोळ्यांनी पाहून आलोय. त्या क्षणापासून मला हे आश्चर्य वाटत तिला दृष्टी नाही ,मग वेळेचं भान इतकं अचूक कसं? आज माझ्या मैत्रिणीचा ठाणे (मुंबई )येथे सत्कार होतोय.तिच संपुर्ण समर्पण आपल्या मुलीच्या जीवनासाठी दिल आहे.मला यात एक खंत वाटतेय ती म्हणजे ज्या संस्थेन अशा अपत्यांना सांभाळणा–या आईचा सत्कार ठेवलाय त्यासंस्थेन त्या संवेदनशील बाबांना दुय्यम का ? समजल आहे.पण मी मात्र त्या दोघांना सँल्युट करतो.कारण दोघंही एकसारखेच संवेदऩशील आहे आपल्या मुलीबाबत …पुन्हा त्या आईबाबांना माझा सँल्युट .मी गर्वाने सांगु शकतो माझी मैत्रिण व तीचा नवरा एक चांगले आई बाबा आहेत.
अलीकडे या दाम्पत्याशी वरचेवर फोनवर बोलणं होत असत.त्यांची धाकटी मुलगी एच आर मॅनेजर आहे. सुट्टीत घरी येतांना ती आपल्या बहिणीसाठी तिला आवडणाऱ्या खेळणी आणून देते. यात तिच्या खोड्या काढून एकमेकींना चिडवण्यात दोघी सुट्टी घालवतात.यात म्हशे ,जाडे असे जिव्हाळ्याचे शब्द त्यांच्या आई बाबांना आनंद देऊन जातात. श्री व सौ गिरीश देशपांडें यांच्या या जीवनप्रवासाकडे जवळून पाहिल्यास एक नक्की वाटते,यांची तुलना ,बरोबरी आपल्या पैकी कुणीही करू शकत नाही. म्हणूनच या दाम्पत्याला सलाम
.
