उधारीत स्वेच्छा निवृत्ती योजना
याकडे कोण लक्ष देणार
![]() |
| BSNL VRS1 |
कशी आहे योजना
मला आश्चर्य वाटले की ती कंपनी प्रचंड नुकसानात आहे, बीएसएनएल कामगारांसाठी व्हीआरएस योजनेसाठी आमच सरकार 75 हजार कोटींची तरतूद का करते? या व्हीआरएस प्रोग्राममध्ये( स्वेच्छा निवृत्ती)योजनेत सरकार त्यांचे हे खाते अतार्किक अटींद्वारे निकाली काढते. माझ्या माहितीनुसार जे लोक व्हीआरएससाठी अर्ज करीत आहेत, त्यांना ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह रकमेसह आणखी तीन, चार वर्षे पूर्ण पगाराची रक्कम. अर्थशास्त्राची फारशी माहिती नसलेल्या कोणत्याही नागरिकालाही आकडेवारी आकर्षित करण्यासारखी आहे. सध्याची परिस्थिती बीएसएनएलकडे कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यासाठी पैसा नाही.
![]() |
| BSNL VRS |
का म्हणतोय उधारीत स्वेच्छा निवृत्ती ?
वर दिलेल्या फोटोत सरासरी पन्नास वर्ष वय असलेल्या बी एस एन एल कर्मचाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीची रक्कम किती असेल याची माहिती देणारा आहे. या योजनेनुसार मिळणारी रक्कम ही सुमारे ९७ लाख इतकी होते. व सदर कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती न दिल्या त्याची सेवा पूर्ण झाल्यास त्याला १ कोटी १३ लाख रुपये रक्कम सरकार कडून मिळणार आहे.सध्या तरी सरकार या योजनेत सहभाग घेणारे कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात पैसे देणार असल्याचे समजते. त्यातला पहिला टप्पा हा मार्च २०२० अखेर व उर्वरित रकमेचा दुसरा टप्पा हा जून २०२० मध्ये देणार आहे. यामुळेच आम्ही याला ‘उधारीत स्वेच्छा निवृत्ती ‘ असे म्हणतो आहे.
कशासाठी हा द्राविडी प्राणायाम.
वास्तविक आमचे सरकार किंवा ज्याला बीएसएनएल खाजगीरित्या चालविण्यात रस आहे, त्यांना फक्त बीएसएनएलच्या अचल संपत्तीमध्ये रस आहे. जी संपूर्ण देशात आहे. त्यातल्या त्यात शहराच्या मध्यभागी किंवा मुख्य स्थानावरील सर्व मालमत्ता आहेत. त्याची आजमितीला असलेली किंमत अंदाजे काही अब्ज रुपयांची असावी.भारतातील लाखो गावे आणि हजारो मेट्रो शहरांमध्ये आहे. जेथे जेथे प्राइम लोकेशन मध्ये ठिकाण आहे त्या ठिकाणच्या सर्व ठिकाणी bsnl च्या मिळकती आहे.कदाचित यामुळेच सरकारने 75 हजार कोटींची तरतूद केली असे वाटते.

