पुरस्कारासाठी नाव जाहीर, पण ऐनवेळेला यादीतून नाव गायब.
अलीकडे राज्यसरकार समाजातील कर्तृत्वान नागरिकांना पुरस्कृत करण्यासाठी नवनव्या योजना राबवित आहे. अशीच महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान वितरण झाले ; राज्य सरकारचा स्तुत्य निर्णय हा महिलांच्या कर्तुत्वाला बळ देणारा आहे.
या पुरस्कारासाठी पुणतांबा ग्रामपंचायत ने यासाठीच्या महिला निवडल्या. त्यांची नाव पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाने जाहीर केली. ज्यांचे नाव होते त्यांनी वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर लोकांचे अभिनंदन स्वीकारले. असे असून ऐनवेळी स्वाती टोरपे या महिलेचं नावच यादीतून वगळण्यात आले. ११ मे रोजी सरपंचाची निवडणूक न झाल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक आहे .असे असूनही ऐनवेळेवर टोरपे यांचे नाव वगळण्यास कुणी सांगितले हा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. या पुरस्कारासाठी अर्ज न भरलेल्या महिलेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने या योजनेची विश्वास पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे .
अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार पात्रता निकष
- महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गावातील 2 महिला.
- सदर महिला त्याच ग्रामपंचायत मधील रहिवासी असणे गरजेचे आहे.
- महिलेने कार्य हे ग्रामपंचायत मध्ये गेलेले असावे.
- महिला व बालविकास क्षेत्रात किमान 3 वर्ष महिलेने कार्य केलेले असावे.
- पुरस्कार प्राप्त महिला या 7 वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी पुन्हा प्राप्त ठरणार आहेत.
- महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव संवेदनशिलता असणे गरजेचे आहे.
- सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.
- पुरस्कारासाठी पात्र असलेली महिला अत्याचारांमध्ये समाविष्ट नसली पाहिजे.
- बाल विवाह प्रतिबंध , हुंडा निर्मूलन , लिंग चिकित्सा प्रतिबंध , घरगुती हिंसा प्रतिबंध , महिला सक्षमीकरण , महिला स्वयंसहाय्यता बचत गट , आरोग्य , साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतलेली महिला असणे बंधनकारक आहे.
महिलेची निवड करण्याची कार्यपद्धत
ज्या महिला या पुरस्कारासाठी इच्छुक आहेत अशा सर्व महिलांनी आपल्या वैयक्तिक माहितीचा तपशील आपल्या गावातील ग्रामपंचायतकडे सादर करणे आवश्यक आहे व अर्ज करणे देखील आवश्यक आहे.
यंत्रणा
- जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपरोक्त उपक्रम योग्य पद्धतीने राबविण्याची दक्षता घेणे बंधनकारक आहे.
- तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व संरक्षण अधिकारी
