समाज माध्यम तुमच्या इज्जतीशी खेळत आहे .
सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे .
समाज माध्यम आणि वापरकर्त्यांच्या वयक्तिक माहितीचा वापर याबाबत आमचं सरकारी धोरण हे निश्चित नाही. परिणामी कोट्यवधी लोकांचं अगदी व्यक्तिगत जीवन सार्वजनिक होत आहे.याचा वापर कसा करायचं याची माहिती नसल्याने आपले नागरिक आपली सर्व माहिती जी अत्यंत व्यक्तिगत आहे . ती सहजपणे सोशल मीडियावर सार्वजनिक करत आहे. याबाबत सरकार कडून किंवा या सोशल मीडिया कडून कुठलाही लोक जागर नाही. पण हा प्रकार गंभीर आहे. यावर उघड चर्चा ,लोक जागर कार्यक्रमाचे ,लोक शिक्षणाचा मार्ग सरकारला अवलंबला पाहिजे. ते जर बघ्याची भूमिका घेऊन अभिव्यक्ती स्वतंत्र जपणार असेल तर नवख्या वापरकर्त्यांचं व्यक्तिगत जीवन हे सार्वजनिक होतंय हे लक्ष्यात येत तो पर्यंत त्याची करमणूक झालेली असते. त्याच बरोबर याच्या वयक्तीक जीवनाचा बाजार या सोशल मीडिया वेबसाइट सर्रासपणे करत आहे. व पैसे कमावत आहे .
अलीकडे वर्ष दोन वर्षांपासून दिवसाकाठी एकतरी पोस्ट वाचायला मिळते, माझे फेसबुक अकाउंट हैक झाले आहे . कुणी पैसे मागितले तर देऊ नये . काल याच्या पुढचे व्हर्जन पाहायला मिळाले ,ते म्हणजे आमच्या एका मित्राने त्याने न केलेल्या पापाचा कबुली जबाब फेसबुक वर त्याच्याच फेसबुक वॉलवर सार्वजनिक केला गेला जणूकाही तो हे सर्व स्वतः लिहीत आहे . वाचून सर्वाना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. मी ती पोस्ट दोन वेळा वाचली ,त्यानंतर मला एक प्रश्न पडला कि हा कुठल्याही स्तराचा डिप्रेशन आलं तरी असं काही लिहू शकतो का ? याशिवाय एकदम बिनधास्त ,धाडसी जीवन जगणारा माणूस इतका हतबल होऊ शकतो का ? याच उत्तर न मिळाल्याने आज सकाळी फोन करून चौकशी करू असा विचार केला. त्यावर आज त्याचंच खुलासा फेसबुक वर वाचायला मिळाला. त्यानुसार तो जे वापरत नव्हता ते फेसबुक अकाउंट आहे . त्यावर हा सर्व प्रकार घडला . त्याची चौकशी पोलीस करीत आहे. हि बाब समाधानाची आहे . असे प्रकार घडत आहे. याच आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण आपण स्वतः आपलं जीवन आता सार्वजनिक करायला उत्सुक आहोत. घरची स्त्री आणि संपत्तीचे प्रदर्शन करू नये अशी अलिखित शिकवण आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वैर होत आहोत. म्हणूनच बायको हि अत्यंत व्यक्तिगत जिव्हाळ्याची व्यक्ती आहे. तिच्या सोबतच्या नको त्या शेल्फी आता आपल्याला कधी सार्वजनिक करू असे झाले आहे.
माझ्या मते सामान्य नागरिकांचा सोशल मीडिया म्हणजे “फेसबुक ” आहे . आणि फेसबुक हे गटर आहे. तेव्हा यावर कुणी पैसे मागितले तरी द्यायचे नाही. त्यासोबतच आपली बदनामी कारक काही आले तरी त्याकडे लक्ष द्यायचे नाही. यातलं जे चांगलं आहे ते घ्यायचं बाकी सर्व गोष्टी या सरळ दुर्लक्ष करण्याच्या आहे. इथून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. तेव्हा फक्त करमणूक ,काही शिकता आले तर शिकायचं .
जर फेसबुक अकाउंट हॅक होत असतील तर फेसबुकची सुरक्षा व्यवस्था हि किती कमकुवत आहे. अशा या संस्थेला आपल्या देशात का मान्यता द्यायची ? हा प्रकार आपल्या सरकारने विचारात घेतला पाहिजे. सरकारने फेसबुकची परवानगी ,यातून खात्रीलायक बाहेर पाडण्याचे मार्ग सार्वजनिक करण्यासाठी फेसबुकला आदेश केला पाहिजे.
एकशे चाळीस कोटींच्या देशात किमान चाळीस कोटी लोक जरी हे वापरात आहे तर फेसबुक हि संस्था जाहिरातीतून किती कोटी महिना कमावता आहे. त्यातली फुटकी कवडीही सरकारला मिळत नसावी ,मिळत असेल तर सरकारने जाहीर करावे . अलीकडे तर FACEBOOK ,YOUTUBE , INSTAGRAM या संस्था फक्त भारतीय मटेरियल वर सुरु आहे. असे वाटते. यातून लोकांना पैसे मिळतोय. हा पैसे कुठल्या मापदंडाने दिला जातो याचा कुठलाही खुलासा ,व्याख्या स्पष्ट नाही. यावर सरकारच मौन आहे. जे लोक दोन पैसे CTR ( क्लिक थ्रू रेट ) ने पैसे कमावते तो देश जगातला सर्वात मोठा जाहिरात पाहणारा देश आहे. कि ज्या जाहिरातीतून अब्जावधी रुपये या कंपन्या कमावत आहे. Google दाखवत असलेल्या जाहिरातीवर कॉन्टेन्ट म्हणजे आपण लिहिलेले लेख ,बनवलेले व्हिडीओ यावर ५५ टक्के शेअर आपल्याला म्हणजेच कन्टेन्ट पुरवणाराना देते ,पण जाहिराती सुरु करण्यासाठी अनेक अटी शर्ती आहे. त्यात ते संत होण्याचे अवसान आणून दोन पैसे CTR ने पैसे देत आहेत. यात आमचे विकासपुरुष नितीन गडकरी यांचेसह काही हजार युटूबर या लोकांना लाखो रुपये महिन्याकाठी देतात.व जे पैसे कमावुन बसले ते लोक तुम्ही आम्ही पैसे कसा कमावू शकतो हे सांगून त्यांचे कॉन्टेन्ट पाहायला भाग पाडत आहे .
हे सर्व पाहिल्यानंतर आमच्या सरकारने आमच्या देशाचा प्रभावी असा सोशल मीडिया का बनवू नये ? हा प्रश्न समोर येतो . त्यात जबाबदारी नको आहे ,किंवा आमची सरकार जबाबदारी वासून पळ काढत आहे . असे म्हणता येईल. आज ते या अमेरिकेन संस्था आहेत त्यांचे सर्वर तिकडे आहे. अभिव्यक्ती स्वतंत्र आहे अशा पळपुट्या कारणांनी तपास करू चौकशी करू यावर नागरिकांची बोळवण करीत आहे . याची विषयावर आणखी खूप काही लिहिण्यासारखं आहे. तेही प्रसंगी लिहू या . आज फक्त एकच सांगतो सोशल मीडिया वापरताय थोडे जागरूक व्हा . यावर आपल व्यक्तिगत जीवन सार्वजनिक करू नका.
