सरकारी अधिनियम कशासाठी बनवतात ,
जर ती पाळायची नसतील तर बंद करा हि फसवेगिरी …
२००४ चा अधिनियम वेशीला टांगत साई संस्थान मंडळावर १५ राजकीय आप्त स्वकीयांची विश्वस्थपदी निवड करीत सरकारने पुन्हा एकदा शिर्डी देवस्थानात राजकीय आखाडा उभारला आहे.सरकारच्या या कृतीने भाविकांचीच नव्हे तर जनतेची फसवणूक झाली आहे,
दरम्यान श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्थ मंडळाच्या अध्यक्षपदी भक्त मंडळाचे सभासद नसलेल्या जयंत ससाणेची निवड करून साई भक्त मंडळाचे महत्व कमी करीत इच्छुकांना राजकीय दबाव तंत्र अवगत करण्याचा संदेश दिला आहे.तसेच राज्य सरकारचे नियम,अध्यादेश हे फक्त कागदावर दाखविण्यसाठीचे असतात हि बाब उघड झाली आहे.
२००४ मध्ये राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढून साई बाबा संस्थान विश्वस्थ मंडळाच्या विश्वास्थांची निवड प्रक्रिया व कामकाजाचे अधिकार यांची मार्गदर्शक तत्वे निश्चित केली.या अधिनियमात या मंडळावर विश्वस्थ होण्यासाठी तो साई भक्त मंडळाचा सभासद असणे अनिवार्य असल्याचा नियम बनविला.या नियमाला पायदळी तुडवत गेल्या विश्वस्थ मंडळात अध्यक्षासह सुमारे १० विश्वस्थ हे भक्त मंडळाचे सभासद नव्हते,तसेच या मंडळातील काही विश्वास्थानी ने आपले राजकीय वजन वाढावे यासाठी या पदाचा गैरवापर केल्याचे,अवैध मुदत वाढीचे व साई भक्तांच्या दानाचा उपयोग आपल्या मतदार संघात केल्याचे कारणांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी,संजय काळे ,राजेंद्र गोंदकर यांनी उच्च न्यायालयात या गलथान प्रकारात दाद मागितली.परिणामी न्यायालयाने १५ दिवसात नवीन विश्वस्थ मंडळ नियुक्तीचे आदेश राज्य सरकारला दिले त्याची मुदत काल मध्यरात्री संपली.
याच वेळी राज्य सरकारने १५ विश्वास्थांची नवी यादी जाहीर केली,यात जयंत ससाणे यांची पुन्हा अध्यक्ष पदी निवड करीत घनश्याम शेलार यांची उपाध्याक्षपदी निवड केली आहे.तर विश्वस्थ म्हणून राधाकृष्ण विखे पाटील,विलास यादवराव कोते,शैलेश कुटे,सुरेंद्र खर्डे,मिनिनाथ पांडे,अजित कदम,पतिंगराव शेळके, ,स्नेहलता कोल्हे,राजेंद्र पिपाडा, ,सुरेश वाधवान,डॉ.नामदेव गुंजाळ, प्रकाश चांदोरकर व पदसिद्ध विश्वस्थ म्हणून सुमित्रा कोते अशी यादी जाहीर केली आहे.
या यादीत राष्ट्रवादीने विखेंना शह देण्यासाठी घनश्याम शेलार,सुरेंद्र खर्डे,राजेंद्र पिपाडा हे कट्टर कार्यकर्ते दिले आहेत.तर राजकीय प्रतिनीधी म्हणुन शंकरराव कोल्हेंनी सौ.स्नेहलता कोल्हे,मधुकर पिचडांनी मीनीनाथ पांडे,गोविंदराव आदिकांनी शैलेश कुटे,अजित पवारांनी अजित कदम,बाळासाहेब थोरातांनी विलास कोते,व डॉ.गुंजाळ असा आप्तस्वकीयांचा गोतावळा विश्वस्त म्हणुन नियुक्त केला आहे.तर या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयंत ससाणे व राधाकृष्ण विखे पाटील हे पुर्ण तयारीत आहे.
या मंडळात सामान्य साईभक्ताला कुठेही वाव देण्यात आलेला नाही,अहमदनगर जिल्हयाला झुकते माप देण्याच्या नादात उर्वरीत महाराष्ट्रातील साईभक्तांवर सरकारातील कर्त्याधर्त्यांनी अन्यायच केला आहे.