credit : mukundcredit : mukund

सुदान मध्ये अडकलेल्या भारतीय कामगाराच्या संकटात वाढ .


सुदान मध्ये सत्ता पक्ष व खाजगी मिलिटरीचे मालक यांच्या सुरु झालेल्या संघर्षामुळे सुदान मध्ये युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. या सत्ता संघर्षात भारतीय कर्मचारी भरडले जात आहे .
भारतीय दूतावास या कामगारांच्या संपर्कात आहे . पण अचानक बंद झालेल्या बँका ,बाजार यांनी या कामगाराच्या संकटात वाढ केली आहे .


खार्टूम शहरापासून सुमारे चारशे किमी वर असलेल्या केनाना साखर कारखान्यात भारतातील सुमारे २० कुटुंब व ४५० एकल मजूर अडकून पडले आहे . या सर्वांचे पासपोर्ट त्याने मुख्यलाय खार्टूम येथे आहे . त्यात अडकले आहे . हे सर्व कर्मचारी जिथे निवास करीत आहे .या कारखान्यात जवळपास सर्व महत्वाची कामे भारतीय लोक करतात . स्थानिक लोक हि बिगारी कामासाठी आहेत .


त्या व्हायटन राज्यातील राबाक जिल्यात आज भाजीपाला संपला आहे . गेल्या महिन्यात सुदानी ५०० पौंडात तीस चाळीस टोमॅटो मिळत होते ते आज फक्त चार पाच मिळत आहे . त्याच सोबत २० किलो तांदुळाची गोणी आज चार हजार पौंडांना घ्यावी लागत आहे. आज तर टोमॅटो ९ डॉलर ला एक किलो असे विकले गेले आहे . हे महाग आहेत पण आता लोकांकडे पैसे नाही . महिनाभराआधी ८०० सुदानी पौंडांना मिळणारी साखर आज पंधराशे पौंड देऊनही मिळत नाहीय . कारण बँक बंद आहेत .
या अडकून पडलेल्या कामगारांत बिहार , महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश , उत्तर प्रदेश ,गुजराती येथील नागरिकांचा समावेश आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *