वंदे भारत मोदी सरकारचे स्वप्न साकार.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील एक महत्वाकांक्षी योजना वंदे भारत नावाची सर्व सोयींनी युक्त अशी जलद गती रेल्वे धावायला सुरुवात झाली.महाराष्ट्राला आज दोन वंदे भारत मिळाल्या आहे . त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स वरून रवाना केले .यातील एक शिर्डी तर दुसरी सोलापूर करीत सहा दिवस धावणार आहे.देशातील दहावी वंदे भारत आज राज्यातून धावणार आहे.
वंदे भारत या रेल्वेत काय असले ?
या रेल्वेत प्रवाश्याकरिता दोन प्रकारच्या बैठक व्यवस्था असणार आहे . यात चेअर कार ज्याला सी सी म्हटले जाते. व दुसरी व्यवस्था एक्झिक्युटिव्ह क्लास ज्याला इ सी म्हटले जाते असे दोन प्रकार असतील . याशिवाय यात जेवणाची सुविधा असणार आहे . त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र पैसे आकारले जातील. त्याशिवाय या रेल्वे प्रवासात तुम्हाला चाय ,चाय म्हणणारे ,गाणे म्हणत पैसे मागणारे तसेच आशीर्वाद देण्याच्या मोबदल्यात पैसे मागणारे अर्वाच्च शिवीगाळ करणारे नकली तृतीय पंथी नसणार आहे.
कसे असेल याचे भाडे ?
मुंबई येथून नाशिक आणि शिर्डीचे पर्यंतचे एक्झिक्युटिव्ह क्लास चे भाडे सरासरी ११५० हे एकच आहे. पण चेअर कार करीत ते नाशिक पर्यंत ५५० तर शिर्डी पर्यंतचे ८०० असणार आहे. हे भाडे एस टी बसच्या दुप्पट तर सध्या पॅसेंजरच्या तुलनेत तीनपटीने ज्यास्त असणार आहे. तर मुबई ते सोलापूर एक्झिक्युटिव्ह क्लास करीत १९७० रुएए असणार आहे . व चेअर कारचे मुंबई सोलापूर ९६५ रुपये असतील. याच गाडीने पुण्यापर्यंत प्रवासासाठी इ सी करीत ११३५ मोजावे लागतील तर सी सी करिता ५६० रुपये मोजावे लागतील .
किती वेळात प्रवास होईल ?
मुंबई ते शिर्डी हि वंदे भारत सुमारे पाच तास वीस मिनिटात पूर्ण करेल. तसेच एकाच दिवसात मुंबईकरांना शिर्डी वारी करून घरी पोहच करणार असल्याने मुबईच्या साई भक्ताची चांगली सोय झाली आहे.त्यासोबतच शिर्डी परिसरातील तसेच विदेशी नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी हा शिर्डी मुंबई प्रवास सोयीचा होणार आहे. हि गाडी सहा दिवस सुरु असेल. ती मुंबई सी एस एम टी वरून सकाळी ६: २० वाजेल निघून शिर्डीत ११:४० मिनिटांनी आलेली असेल. तसेच परतीच्या प्रवासासाठी शिर्डीतून संध्याकाळी ५:२० ला निघून मुंबईत रात्री ११:४० ला पोहचणार आहे.
शिर्डीच्या अर्थकारणावर काय परिणाम होतील ?
वंदे भारतच्या सुरु होण्याने मुंबईकरांचा शिर्डीतील मुक्काम बंद होतील. शिर्डीत दुपार पर्यंत मुंबईकरांची गर्दी असेल. रस्ते व मंदिर परिसर गजबजलेला असेल. मात्र व्यापार उदीम फार वाढण्याची शक्यता कमी आहे. गतिमान दळणवळण हे याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसणार आहे .तसेच ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाची मनमानी या वंदे भारतने संपणार आहे. त्यांना मुंबईत फिरून ठराविक धाब्यावर अर्धा अर्धा तास थांबून प्रवाश्याना रात्रभर प्रवास करायला लावण्याची सवय बदलावी लागणार आहे. अर्थात त्यांनाही गतिमान व्हावे लागणार आहे.शिर्डीकराना आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत अशा स्वागताची तयारी सुरूच ठेवावी लागणार आहे.त्यासोबतच शिर्डीकरांना आपल्या दैनंदिन व्यवहार पद्धतीत अनेक बदल करावे लागणार आहे. गजबज वाढेल ,बुजबुज वाढेल त्यासाठी आपण सज्ज आहोत का ? याच उत्तर शोधणे खुप गरजेचं आहे.
वंदे भारत रेल्वे प्रशासनाची सत्व परीक्षा आहे
वंदे भारत सारखी गतिमान रेल्वे चालविण्यासाठी संपूर्ण भारतभरात तितक्या गतीची रेल्वे लाईन नाही. अलीकडच्या वर्षात रेल्वेचे खूप कामे सुरु आहे. असे असले तरी आणखी किमान तीन वर्ष तरी हि व्यवस्था गतिमान करणे अशक्य आहे. एकट्या वंदे भारतचा विचार केला तरी तिला अगदी वेळेत चालविणे हे स्थानिक रेल्वे व्यवस्थापनासमोरचे मोठे आव्हान आहे. हि रेल्वे थेट मुंबई येथून पुणतांबा स्टेशन पर्यंत सरासरी नव्वद ते शंभर किमी प्रति तास या गतीने येऊ शकते पण येथून शिर्डी पर्यंत तिला निम्म्या गतीने चालावे लागणार आहे.वंदे भारतच्या गतीची याच मार्गावर चालणारी एक रेल्वे फक्त शनिवारी सकाळी शिर्डी ते मुंबई सुरु आहे.बहुदा हि या वंदे भारत च्या ट्रायलचा भाग असू शकतो.
