दसरा मेळाव्यांचा अर्थ
कोरोना महामारी नंतर लगेच देशासह राज्यात राजकीय महामारी आली.यात जे लसीकरण झाले त्यातून महाराष्ट्राचं सरकार कोसळलं.नवीन घटनाबाह्य सरकार स्थापन झाले. जर हे सरकार घटनात्मक असते तर सर्वोच्च न्यायालयाला घटनापिठाची स्थापना करावी लागलीच नसती हे आधी समजून घ्यावं लागेल.आताच्या सरकारने हिंदुत्वाला वाव देण्याचे ठरवले. यातून यंदाचे हिंदू उत्सव जोमात संपन्न झाले. अर्थात कोरोना महामारीच्या निमित्ताने जगात मानवी समाज एकत्र येण्यास पायबंद लागला होता.त्याही कारणांनी हे सर्व उत्सव जोमात साजरे झाले. याच निमित्ताने राजकीय लोकांना लोकांमध्ये जाण्याची संधी उपलब्ध झाली.गेल्या दोन वर्षात हि मंडळी जिवाच्या भीतीने भूमिगत झाली होती. त्यातून जनतेपासून दुरावली होती. हा दुरावा कमी करण्यासाठी उत्सवांची आयडिया कामी आली असं म्हणूयात.
चार दसरा मेळावे
राज्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी दसरा मेळावे जोरात संपन्न झाले.त्यातल्या त्यात मुंबईच्या दोन्ही मेळाव्यावर लोकांचे लक्ष होते.ते फक्त गर्दी जमवण्यात कोण यशस्वी होत ,यावर राज्यच देशाचं लक्ष होत.यातून फुटलेल्या पन्नास लोकप्रतिनिधीच भवितव्य दिसत आहे.हा सरळ अर्थ जरी विचारात घेतला तरी शिवसेनेनं दोन्ही काँग्रेस सोबत युती करून जे सरकार स्थापन केले.ते चुकीचेच होते यावर ठाम असलेला समाजही आहे.वास्तविक पाहता भाजपने प्रचार करीत राज्यातील सरकार स्थापनेचा मार्ग सुखकर केला होता.परंतु राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नाही किंवा मित्र नाही या नीतीला मान्यता द्यावीच लागेल.या चारही मेळाव्याचे बारकाईने निरीक्षण केलं तर यंदाचे मेळावे हे फक्त आपले कार्यकर्ते आपल्या सोबत आहे का ? याची पडताळणी करण्यासाठीचे होते.यातून एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेचा परिवार ,रामदास आठवले ,पंकजा मुंढे आपल्या राजकीय अस्तित्वाचा आढाव घेतला आहे.
या मेळावे सूचक होते कि दिशा दर्शक
एकनाथ शिंदे कडे स्क्रिप्टेड विचार व दिशा होती. ठाकरे कडे सहानुभूती व भाषण शैलीचा वारसा होता. पंकजा मुंढे कडे उपजत एकाच धाटणीचे भाषण होते. जोश होता. आठवले कडे आपला नेहमीच अजेंडा यात नवीन असं काही नव्हतं. ऐकूनच स्वर्गीय बाळासाहेबांच्या भाषणाची जी ओढ असायची ती यंदा दिसली नाही.पण त्यांच्यावरील प्रेमापोटी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली.हीच गर्दी येत्या निवडणुकीत मतात परिवर्तित झाली तर पन्नास खोके घरीच बसले असं मानायला हरकत नाही.हि जनशक्ती देवेंद्र फडणवीसांना शिवसैनिकांना विचारात घेण्यास कमी पडलो याच दर्शन घडवणारी आहे.त्यासोबतच शिवसेना म्हणून ठाकरे परिवार किंवा ते देतील तो उमेदवार यासोबत खुद्द पंकजा मुंढे या थेट फडणवीसांच्या रेस मध्ये आहेत.हे या मेळाव्यांचे सूचक आहे.कार्यकर्त्यांवर काही बोलायलाच नको. आणखी काही शतक त्यात बदल होणार नाही. तो नेहमीच नेत्याच्या दुःखाला स्वतःचे दुःख मानून आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून नेत्याच्या उद्गारात स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेण्याला देशभक्ती ,राष्ट्र कर्तव्य मानत आलेला आहे. त्याच्या याच प्रामाणिक भक्ती व भारावलेपणामुळे इंग्रजानी,मुघलांनी आपच्या देशावर राज्य केलं .हे तेव्हाही चाकरी करीत होते आजही करीत आहेत.असो येणारी निवडणूक हे कार्यकर्ते किती जागरूक व डोळस झाले आहेत याचे दर्शन घडवणारी असेल.
अभ्यासपूर्ण चिकित्सा
dhanywad