sai samadhi mandir

“साईबाबा संस्थान हे धार्मिक व सेवाभावी संस्थान आहे”. 

शिर्डीच्या साई दरबारी वर्षाकाठी कोट्यावधी भाविक येतात.यात गरीब,श्रीमंत,अति श्रीमंत ,विदेशी ,अनिवासी भारतीय असे सर्व वर्गातील भाविक समाविष्ट आहेत.साईबाबांच्या देहावसनानंतर साईबाबा ट्रस्टची स्थापना झाली. अर्थात हि करणारे शिर्डीचे निवासी नव्हते. ते मुंबई .नागपूर ,कोल्हापूर यासह राज्यातील अनेक शहरातून येणारे भाविकांनी केली होती.असे असले तरीही इथल्या सर्व व्यवस्था या शिर्डीकरांनीच केल्या व .आजही करत आहे.

 https://sai.org.in/

अशा असीमित,अगणित भाविकांच्या संख्येने व दानाने आमचे सरकारही भारावून गेले. याच सरकारच्या आयकर विभागाने साईबाबा संस्थान हे धार्मिक व सेवाभावी संस्थान आहे हेच अमान्य केले. परिणामी सन २०१५ -१६ मध्ये या विभागाने संस्थानाला आयकर भरण्याची नोटीस जारी केली.ती हि सुमारे १८३ कोटी रुपयांची रक्कम भरण्याचा फतवा काढला. नियमाप्रमाणे तारीख पे तारीख सुरु झाली.अपील झाले, साईबाबा संस्थान हे धार्मिक व सेवाभावी संस्थान आहे. हे पटवून देण्यासाठी अनेक दाखले ,पुरावे दिले. ते मान्य केल्यानंतर साईबाबांचे तिजोरीत येणारे उत्पन्न हे स्पष्ट दानाचे आहे. ते धार्मिक कार्यासाठी दान केलेले आहे. ते सेवाभावी कार्यासाठी दान केलेले आहे. त्यामुळे ते देशातील अन्य देवस्थानासारखेच साईबाबा संस्थान हे हि धार्मिक देवस्थान आहे. इथे हि अत्यल्प दरात ,प्रसंगी ना नफा ना तोटा तत्वावर भक्त सुविधा व समाजासाठी सेवाभावी इस्पितळ ,शाळा चालविल्या जातात हे आयकर विभागाने मान्य केले आहे.यावर शिक्का मोर्तब करीत आयकर विभागाने साईबाबांच्या दक्षिणा  पेटीत येणारे दान आयकर मुक्त केले. 

https://sai.org.in

हे सर्व का झाले ? असा प्रश्न आपल्याला पडला नसेल आपल्याला काय घेणं ? हे सर्व त्याच याचिका कर्त्यांच्या प्रयत्नांनामुळे झाले आहे.त्यांनी जर अपील करायला भाग पडले नसते तर संस्थानची थेट हजार बाराशे कोटी रुपये कर भरण्याची तयारी होती.या वास्तवाकडे जरासं सकारात्मक बघा.या एकशे पंच्याहत्तर कोटीचा कर वाचविल्याचे श्रेय भलेही संस्थान अधिकारी ,विश्वस्त घेऊ देत.असो या संपूर्ण प्रकरणांने साई संस्थांनच्या मागे लागलेला आयकराचा ससेमिरा कायमचा संपुष्ठात आला आहे.आता संस्थानला समाजासाठी काम करणे आणखी बंधनकारक आहे. भाविक केवळ शिर्डी नगरपालिकेच्या व फक्त संस्थान कर्मचारी व गावकरी यांचे विकासासाठी हे दान करीत नाही तर साईबाबा संस्थान जे समाजासाठी कार्य करते ते आणखी विस्तारावे यासाठी करतात.यावर गंभीरतेने विचार करायला व कृती करावी लागेल.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *