गुड बाय २०१९ 


वर्षा मागून वर्ष लोटती… गती न कळे त्याची. असेच काहीसे कालचक्र झपझप फिरत आहे. कालची दिवाळी डोळ्यासमोरून जाते नाही ,तोच इंग्रजी नवं वर्ष बदलते. दिवसे न दिवस आपण गतिमान होतोय. नेमकं काय कारण असेल या गतिमान होण्याचं हे सहजतेने उलगडणार नाही. कारणही तसच हे आम्ही सारे वर्चुअल होतोय. मग आनंद दुःख हेही वर्चुअल होत चालली आहे. २ जी ,३ जी ,४जी ,५ जी … पुढे अनंत जी.हाच प्रकार सर्वत्र विराजमान आहे. हा न थांबणार प्रवास आहे. यात दिवसेंदिवस गुरफटत आहोत. कदाचित यामुळेच आम्ही गतिमान झालोय. 
आता अटोमोबाइल मध्ये ही या जीचा प्रभाव सुरु झाला.यातून आम्ही एका दिवसात दोन चारशे कि मी अंतर दिवसभरात कापून घरी परंतु लागलोय. यातूनच पाहुणचारही गतिमान झाला.सरकार बदललं कार्यपद्धतीत तीच राहिली तरी विमानतळ वाढली. त्यानेही गती वाढली. 

वर्चुअल जीवन पद्धतीने आपली पकड बसवली

या गतिमान वर्चुअल जीवन पद्धतीत सोशल मीडियाने समाजावर प्रचंड पकड बसविली. आपले अधिराज्य स्थापित करीत अगदी व्यक्तिगत ,वयक्तिक जीवनही सार्वजनिक करायला गती मिळाली. यातून आमच्या पूर्वजांनी घरची स्त्री व संपत्तीचे प्रदर्शन करू नये असा विचार रूढ केला होता.तो कालबाह्य ठरवीत बायकोचे बिकिनीवरचे फोटो सोशल मीडियावर टाकणारे व सोन्याचे संडासाची भांडे दाखवीत शेल्फी पोस्ट करणारे गतिमान झाले. 

Happy New Year …. 2020

२०१९ कसे होते काय लक्ष्यात राहील 

आगामी वर्षात आम्ही ५ जी मध्ये जात आहोत.यात २०१९ मध्ये नटसम्राट कालवश झाले,प्रचंड पावसाने सारे काही चिंब झाले ,तरीही महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळाच्या छायेत राहिला,काश्मिरातील ३७० हटविले,एन आर सी च्या निमित्ताने दंगली घडल्या,बी एस एन एल च्या ९७ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली,प्रसार माध्यम मुकी झाली ,जनता शक्तिहीन झाली,देशात प्रचंड मंदी असूनही किराणा महागला यावर नियंत्रण ठेवण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आलं, महाराष्ट्रात झिरो मेन्डेड असलेले सरकार आलं,झारखंड ने मोदी शहाच्या रणनीतीवर मात दिली, केजरीवाल ने आपल्या शेवटच्या भाषणात केंद्र सरकारच्या नाकावर टिचून आपल्याला कॅग ने दिलेली शाबासकी जाहीर केली, भूतो न भविष्यती दिल्लीच्या सरकारी शाळांची प्रगती करून दाखविली, वीज अत्यल्प दरात देऊन देशातल्या काँग्रेस ,भाजपा अन्य सरकारवर मात केली, केंद्र सरकारच्या व नेशन वन टॅक्सच्या चार स्थरीय कर प्रणालीच्या असफलतेचे प्रदर्शन घडविले. 

भरपूर अश्या ज्या इथे उल्लेखल्या गेल्या नाही ,त्या सर्व कडूगोड आठवणींनी २०१९ या गतिमान युगातही काही काळ लक्ष्यात राहील.पण त्यासाठी आमच्यावरचा वर्चुअल प्रभाव आमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आमची गती थोडी कमी करावी लागेल…. 
शेवटी कितीही वाईट असलं तरी ये दिन भी जायेगा …. म्हणत २०१९ ला गुडबाय म्हणावेच लागेल.
0 thoughts on “Good bye 2019…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *