बायकोची गोष्ट

                        आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील एक दुसरी बाजू म्हणजे बायको … जी बदलता येत नाही. आपल्या जीवनातून वजा करता येत नाही अशी ती बायको. कुणाच्या नशिबी घरच्यांनी निवडलेली तर कुणाच्या नशिबी आपण स्वतः निवडलेली. या दोनही प्रकारात तुम्हाला समजून घेणारी म्हणजे तुम्ही न बोलता कळणारी फार क्वचित लाभते. तसेच अगदी आयुर्वेद ,धार्मिक रूढी परंपरा यांचा प्रभाव असलेली म्हणजे तुमच्या पेक्षा पाच ते दहा वर्ष्यांचे अंतर असलेली.ती थोडी खासच असते. अन बरोबरीची म्हणजे एक ते चार वर्ष अंतर असलेली ती ही खासच असते .
बायको या प्रकारचे भिन्न अवतार ,रूप ,भूमिका अतुलनीय असतात. पण या सर्व प्रकारात एक साम्य असत ते म्हणजे बायको नावाची वनस्पती नेहमी खापर फोडायला कुणाला तरी शोधूनच ठेवते. जरा चुकलं कि फोडलंच मग ते डोकं सासूचं असो ,जाऊबाईच असो,कि नवऱ्याचं 

दिसायला सुंदर

             … काही बायका फक्त दिसायला सुंदर असतात. त्यांच काम वेगळंच असत. जिथे बोलायला नको,तिथे बोलते अन जिथे आपलेपणाने बोलणे अपेक्षित तिथे तिचा इगो मोठा होतो.या कुठल्याश्या किरकोळ घटनांना लक्ष्यात ठेवतात व हि फार महत्वाची घटना होती,बाब होती हे पटवून देण्यात जीवनाचे आनंदी क्षण वाया घालवतात. 

दिसायला साधारण  

                    काही दिसायला साधारण असतात. मर्यादा पाळणाऱ्या असतात. त्या मनातल्या मनातच बोलतात. ते फक्त त्यांनाच कळत. बराचवेळ त्यांच्या नवऱ्यालाही कळत नाही. मग मनाची कोंडी होते ,कोंडमारा होतो पण त्यासह जीवन जगण्याची कला यांच्यात असते.त्यांच्या अपेक्षा मर्यादित असतात. काही अगदीच सामान्य असतात. यांचं एक वैशिष्टय असत त्या नेहमी आहे त्या परिस्थितीत खुश असतात. त्यांना जुन्या साड्यातही सुंदर दिसण्याची कला अवगत असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वरील सर्व प्रकारापेक्षा खूप विकसित असतो. या स्वप्न रंगवतात पण ती पूर्ण झाली नाही तरी दुखी होत नाहीत. कारण प्रत्येक क्षणी जमिनीवर असतात. हे सर्व निरीक्षण माझ्या वर्गमैत्रिणींना समर्पित आहे. त्या आता त्यांच्या संसारात सुखी आहेत.या वर्णन केलेल्या पैकी मला कुणी भेटलेल्या नाही कित्येक वर्ष्यात तरीही मी त्यांच्या वर्णनावरून बायको या सुखद संकल्पनेची यशोगाथा लिहीत आहे. असो तुम्हाला हि ती आवडेल. 

नवरा बायकोच्या वयातलं अंतर पारंपरिक 

भाग दुसरा म्हणजे वयाच अंतर ते जर प[पारंपरिक असेल तर तुम्ही संतापून संतापून आपलं आयुष्य कमी करून घेणार. कारण तुम्हाला जे सांगायचं आहे ते बायको नावाच्या घटकाला लगेच कळेल हि अपेक्षा ठेवू नका.तिला आपण जे सांगतो हे समजायला किमान चार पाच वर्ष लागतील असे नक्की.कारण तिला तुम्ही जे सांगताय ते समजून घ्यायचं नाहीय. त्या ऐवजी तिला आपण जे सांगतोय ते मला का करता येत नाही यासाठी खापर फोडायला निमित्त शोधन्यात तिला धन्यता वाटते.बरेच वेळा त्तुम्ही मला हे आधी का ? सांगितलं नाही यावर बिल फेडायचे असते. नाहीतर मला तुमचं वागणंच कळत नाही, असं म्हणून मूळ मुद्द्यापासून दूर व्हायचे असते.याना एक गोष्ट दोन तीन वेळा सांगितल्यावर किंवा त्या सांगूनही फसल्यावर लक्ष्यात येत मग आमचे हे सांगत होते.यावर आपल्या नवऱ्याला बिरबल समजू लागते तरीही त्याला काय म्हणायचं आहे हे तिला समजून घ्यायचं नसत बर का .या प्रकारात आपल्या सर्व रसिक संवेदना शिथिल झाल्यावर नवरा बायको एकरूप होतात. ओढाताण करून रसिक होण्याचा असफल प्रयत्न करतात. 

वयाचं अंतर कमी  

याच भागात ज्यांचं वयाचं अंतर कमी असत. त्यांचं थोडं लवकर जमून जात.तरीही आमच्या ह्यांचा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे असे म्हणून आपल्या चुका ,बिना आवडीचे खापर गरीब नवरोबावर फोडून मोकळ्या होतात.वरच्या प्रकारापेक्षा सहजतेने या आपल्या नवऱ्याला आपली मर्जीप्रमाने वाकविण्यात यशस्वी होतात.सहजतेने आपल्या आवडी या आपल्या नवरोबावर लादतात. 

समवयस्क बायको..

यातला तिसरा भाग समवयस्क बायको… हा प्रकार काहीसा चमत्कारिकच असतो.याना नवऱ्याने सांगायच्या आधीच कळून जात. कि आपण कोणता रंग परिधान करायचा आहे.वरच्या दोन्ही प्रकारात बायकोला नवरा समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो.इकडे उलट असत बायको समजून घ्यायला वेळ लागतो. याना एका नजरेत नवऱ्याला भर समारंभातून बाहेर घेऊन जाण्याची शक्ती असते. वरच्या प्रकारात नवरा स्वतंत्र उपभोगतो यात क्वचित प्रसंगी तस होत. 
असो बायको नावाची आपली दुसरी बाजू कशीही असली तरी ती प्रत्येकाला आवडत असते. नाही तर आवडून घ्यावी लागते. कारण ती सहज बदलता येणारी नाही. तिच्या वडसावित्रीत बरीच शक्ती असते याची जाणीव पदोपदी होते. तरीही बाबानो पारंपरिक बायको म्हणजे बरच काही … एव्हढंच सांगतो नाहीतर विनाकारण हे कोरोनाच संकट संपताच फारकत घ्यायचा हट्ट धरून बसेल … अशी ती बायको .  
( याचा कुणाच्या जीवनाशी ,व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. हि तणाव कमी करण्यासाठीची लघुकथा आहे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *