व्यवस्थेच्या गलथानपणाने घेतला बळी
जगभर कोविड़ने थयमान घातला आहे. यात सरकार आपल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.यंत्रणा उभारत आहे. उपाययोजना कार्यान्वीत करीत आहे.पण हे सर्व कागदावर…
प्रत्यक्ष कोरोना दर दिवशी लोकांचे जीव घेतोय,त्यापेक्षा किती तरी जीव हे अव्यवस्थेने जात आहेत…
याकडे गम्भीरतेने पाहण्याची हिच वेळ आहे.केवळ महात्मा फुले जीवनदायीच्या भरवश्यावर विसंबून असलेल्या केंद्र व राज्य सरकारने डोळे उघडे ठेवून कृती करण्याची ही वेळ आहे. काल पर्यंत कोरोनच्या नावावर लांडगा आला रे लांडगा आला म्हणनारे सरकारला आता खरोखर लांडगा पाड्यात शिरलाय हे स्वीकाराव लागेल. व त्याचा सामना करण्यासाठी प्रशासकीय मनमानी थांबवण्याची ही वेळ आहे….
पांडूरंगाचा जीव धोक्यात का आला? तर गलथान व्यवस्थेमुळे वेळीच उपचार सुरू झाला असता तर त्याला जग सोडावे लागले नसते.प्रत्येक आजाराला कोरोनाशी जोडून यंत्रणा लोकांचे बळी घेत आहेत. नेमकी कोणती टेस्ट विश्वसनिय आहे? हे सांगण्याची कुवत कुठल्या विज्ञानात वा तंत्रज्ञानात नाही.मग लक्षणावरुन उपचार हिच पद्धत लोकांचे जीव वाचवू शकते हा साधा सोपा तर्क लाखो रुपयांचा पगार घेणाराना लक्ष्यात येत नाही का?
सरकारने भय पसरविन्यात जी शक्ती लावली.त्यापेक्षा किती तरी कमी शक्ती छातीचे सी टि स्कँन करुन निदान करण्यात लावली असती तर कोविड़ रोखण्यात प्रचंड प्रभावीपणे यश मिळाले असते.
रक्त पातळ होण्याचे औषध हे गरजेचे झाले आहे.अश्या वेळी ती रचना करने तसेच लोकाना अन्य कुठल्याही रोगासाठीच्या उपचाराचे मार्ग बंद करुन लोकांचे जीव वाचविण्याचा देखावा आता सरकारने करु नये हे जनतेवर उपकार होतील…..
किमान या महामारिच्या जीवघेण्या संकटात देश्यातील आरोग्य सेवा ही त्या क्षेत्राच्या जाणकारांच्या हाती असावी. फजिल अभिमान बाळगणा-या प्रशासकीय यंत्रणेच्या हाती असू नये.ही साधी बाब सरकार हाकणारानी लक्ष्यात घ्यावी.
पांडुरंगाच्या अवेळी जाण्याची जबाबदारी त्याने उतरवलेल्या विमा कंपनीसोबत सरकारच्या आदेश्याना कचराकुंडी दाखविणा-या खाजगी दवाखान्यानी घ्यावी. एव्हढच नाही तर आपल्या अधिकारच्या अभिमानाला चिकटून बसलेल्या प्रशासकीय यंत्रणेने हा बळी त्यांच्या आभिमानी आदेश्याचा आहे हे स्वीकारुन जनतेची माफी मागावी व आपली जबाबदारी म्हणून सामान्य नागरिकात पुन्हा कोण्या पांडुरंगाचा बळी जावू नये यासाठी आपल्या अधिकाराचा सत्तेचा वापर करावा…..
लिहिण्यासारख बरच आहे पण म्हणतात ना शहाण्याला शब्दाचा…
आपला सहकारी पांडुरंग यास भावपुर्ण श्रद्धांजली….
माधव ओझा,पत्रकार शिर्डी.
