साईबाबा कसे होते ?
साईबाबा म्हटल की डोळ्यासमोर एक छबी उमटते.मग तुम्ही अस्तिक असो की नास्तिक यातुन वेगळे नाहीत. जिथे नतमस्तक होण्यासाठी जगभरातील सामर्थ्यशाली व अगदी कफ्लक असे सर्व येतात. शिर्डीत येणारे करोडो भाविकांना साईबाबा हे आपले मायबाप आहेत.अशी भावना व बाबा प्रति प्रत्येकाची अपार श्रद्धा आहे. इथे आपले दुःख हरण होते.तशी अनुभूती लाखो भक्तांना आलेली आहे .येत आहे. म्हणूनच वर्षाकाठी सुमारे तीन सव्वा तीन कोटी भाविक या भूमीत येतात.खुद्द बाबा हयात होते तेव्हा अगदी कफ्लक लोकांना बाबांचा सहवास सहज मिळत. त्यांच्या तुलनेत त्याकाळी शिर्डीत येणारे अनेक उच्च विद्याविभूषित,अधिकारी हे बाबांची आपल्यावर दृष्टी पडावी म्हणून दिवसदिवस द्वारकामाईत बसून राहत. आता उलट झालय.सामान्य बाजूला पडले आणि श्रीमंत साईंच्या जवळ पोहचवले जात आहे.
शिर्डी कशी होती ?
गेल्या काही दशकापर्यंत साईबाबांच्या दर्शनाला येणारा भाविक हा आपल्या घरी आलेला पाहुणा आहे.ही भावना होती.याच भावनेतून त्याला जो जिव्हाळा वर्षानुवर्ष मिळाला.त्यातून या भक्ताला शिर्डी आपल माहेर वाटत.नव्वदच्या दशकापर्यंत हे चित्र होते.हा जिव्हाळा आजही शिर्डीतील अनेक कुटुंबांनी जपला आहे.यासोबतच सुरुवातीची काही दशक याच शिर्डीतील अनेकांनी विना मोबदला साईबाबांच्या संस्थानाला विनम्र सेवा पुरवली.हे मुख्य कारण आहे, शिर्डीत गर्दी ओसंडून वाहण्याच.
आता कशी आहे शिर्डी ?
अलीकडच्या दशकात शिर्डीत बराच बदल झालाय.ठराविक कुटुंब सोडली तर जिव्हाळा संपलाय.व्यवहार सुरु झालाय.प्रत्येकाला या भविकावर आपला अधिकार गाजवण्याची चढाओढ सुरु झाली.मग अमुक एक ग्रामस्थ चार धनिक भक्ताची दर्शनाची सोय करतो,म्हणून मी पाच लोकाची सोय करावी ही स्पर्धा सुरु झाली.अशा चर्चा खुद्द ग्रामस्थच सार्वजनिक करतात. साईबाबांचे दर्शन सुलभ व सहज व्हावे हे इथे येणारे प्रत्येक भाविकाला वाटते.हि समाजाची सहज प्रवृत्ती आहे.यातून हे सर्व घडत.प्रशासनाचे अधिकारी हे फक्त प्रयोग करायला इथे येतात कि काय असे वाटू लागले आहे.अजय मोरे ,कुंदन सोनावणे ,दीपक मुंगळीकर वगळता इथे येणारे अधिकारी साईबाबांचे तिजोरीतील हजारो रुपये खर्च करून त्यांना दिला जाणाऱ्या बंगल्याची तोडफोड करून घेतात.तर काही परिसरात तोडफोड करून आपण काम करतोय असा आभास निर्माण करतात.वि आय पीच्या दिमतीला उभे राहतात.
संस्थान प्रशासनाने आत्मचिंतणं करावं
तसेच या ठिकाणी काम करणारे अधिकारी आपल्या वरिष्ठाच्या नातेवाईकांना, मंत्री संत्री याना खास सेवा पुरवत असतील तर ग्रामस्थांनी वा इतर विभागाचे कर्मचारी अगदी पत्रकारही जर कुणाला दर्शनाला सोडत असतील तर काय वेगळं असं करतं आहेत.आधी इथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः साठी नियमावली अमलात आणावी मग कुणालाही काहीही सांगायची गरज पडणार नाही. सोबतचे फोटो व्हिडीओ बघाव आणि प्रशासनाने आत्मचिंतन करा.परिणामी सामान्य भाविक हळुहळू दुर होत गेला.कारन तो फक्त आपल्याला पैसे देण्यासाठी आलेला घटक आहे. हा समज वाढीस लागला. त्याची प्रतिक्रिया यातील व्हिडीओत बघायला मिळेल. हे फोटो सोमी वर व्हायरल आहे. यात संस्थान अधिकारी वगळता आमची कुणाची ओळख नाही.


