कोरोना आता जीवघेणा झालाय.

            मित्रांनो,गेल्या वर्षी याच दिवसात मी कोरोनाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थीत करीत “लॉकडावुन” नावाच एक छोटस मराठी पुस्तक लिहिल. जे ऐमेज़ॉन किंडल बुक वर उपलब्ध आहे.त्या पुस्तकात मी या संकटावर अनेक प्रश्न उपस्थीत केले आहेत.

         मुलीच्या cet परीक्षेच्या निमीत्ताने ऑक्टो 2020 मध्ये पुण्याला प्रवास झाला.पुर्ण परिवार सरकारी मनकानुसार कोरोना बाधित झालो.मुलीना लक्षणे असुनही त्यांची Rapid Antijen test  दोन वेळा करुन निगेटीव्ह आली. हा सर्व प्रकार अनेक संशय व गोंधळ निर्माण करणारा आहे. असो.यावर पुन्हा नव्याने प्रकाश टाकू.

         आज वर्षभरानंतर कोरोनच उग्र रूप अनुभवाला येत आहे.आता यात गेल्या वर्षी मी वर लिहिलयप्रमाणे होत असलेल्या गोंधळात एक दुरुस्ती झाली.आता परिवार बाधित होत आहेत.लोक मरण पावत आहेत.

         देश्यातील निवडनुक ,उत्सव,राजकारण हे सर्व फालतू आहे.याकडे दुर्लक्ष करुन आपण कोरोना कडे फोकस करु या. जितक्या टेस्ट वाढतील तितकी रुग्ण संख्या वाढणार हे सत्य आहे. हा ही वाद व संशोधनाचा मुद्दा जरा वेळ  बाजुला ठेवू.

          कोरोनाला घाबरु नका ,अन दुर्लक्षही करु नका.मास्क,सेनिटयजर,गर्दी करने,हे सर्व कुछकामी उपाय आहेत. मुख्य उपाय म्हणजे आपली शारिरीक शक्ती व इच्छाशक्ती ही कोरोनाचा सामाना करण्याचा मुख्य उपाय आहे.या साठी आमच्या पारंपरिक जीवनशैलीचा अवलंब महत्वाचा आहे.रोज चांगल अन्न (घरची भाजी पोळी,वरण भात, इत्यादी ),लहानपणी केलेले PT चे व्यायाम,आसन प्रकार हे रोज सकाळच्या ऊन्हात फक्त दहा मिनिटे करा.निरोगी रहा हा सोपा उपाय आहे.हाच नेमका आम्ही केला नाही.म्हणून बाधित झालो होतो.

कोरोना म्हणजे न्युमोनीया…

 फुफुसाची श्वास घेण्याची शक्तीवर परिणाम करणार आजार/संसर्ग

भयानक का होतो तर फुफुसात रक्ताच्या गाठी होतात (याला सायटोकीन म्हटल जात)फुफुसाला सूज येते,तिथल्या पेशी निकामी होतात.उपचार योग्य न घेतल्यास या रक्ताच्या गाठी फुटतात ( याला सायटोकीन स्टॉर्म असे म्हणतात).रक्ताभिसरणात अडथळा करतात.हार्ट फेल करतात,श्वास लागतो.प्रसंगी मानूस दगावतो.

निदान करण्यासाठी

Xray पुरेसा आहे. ( 60 ते 200 रुपये खर्च ) हे सरकारी दवाखान्यात मोफत केली जाते.

खुप बारकावा तपासायचा आहे तर HRCt करावा (1250 ते  2200 रुपये खर्च )

रक्त चाचणी

सी आर पी ,एल डी एच,डी डायमर,युरिन रूटीन या सर्व टेस्ट साठी 300 ते 550 रुपये खर्च आहे.

https://youtu.be/WlQFL4yz6jA

 

गोंधळून जावू नका हे करा

सर्व प्रथम तुमच्या फमिली डॉक्टरांना सम्पर्क करा.ते काय निदान करतात व उपचार देतात ते घ्या.(कुठलीही ट्रीटमेंट अर्धवट घेवू नका ) जेव्हा म्हणतिल तेव्हा सरकारने नियम घालुन दिले आहे म्हणून कोविड टेस्ट करा.ही टेस्ट शक्यतो सरकारी दवाखान्यातच करा.छातीचा Xray आपल्या कोरोनचे निदान करु शकतो.विनाकारण HRCT स्कोर पाहण्याच्या नादी लागू नका. सरळ उपचार घ्यायला सुरुवात करा.

ही खबरदारी घ्या जर ऑक्सिजन वर जायचे नसेल तर

सर्व प्रथम भरपुर पाणी प्या. सर्व प्रकारचे शरबत मनसोक्त प्या.ORS  प्या. याने तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही चांगली राहिल. म्हणजेच ( ऑक्सिजन हा 100 ते 97 पर्यंत) जी तुम्ही निरोगी असण्याची खूण आहे.कोरोना मध्ये ऑक्सिजनची पातळी ही फार महत्वाची आहे.कोरोना संसर्गात तुमच ऑक्सिजन 92 पर्यंत असेल तरी अजिबात काळजी करु नका.

उपचार कसा व काय केला जातो

Best Amazon Business Offersएक अँटीव्हायरल ,एक अँटीबायोटिक,एक अँटी अपलर्जिक,एक स्तेराईड, एक एन्टासीड, विटामिन सी इन्फेक्शन वाढले तर ओक्सिजनसह इंजेक्शन वर दिलेले प्रकारचे औषधाचे (अलिकडे खुप चर्चेत आलेले रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोनवरील उपचार नव्हे तर रुग्ण पुढच्या स्टेजला जावू नये यासाठी आहेत की जे सर्रास वापरायला सुरुवात झाली म्हणून गरजू लोकाना मिळत नव्हेत,याच रेमडेसिविरची किंमत 899 रुपयाला एक अशी आहे व एका रुग्णाला पाच दिवसात सहा द्यावी लागतात. ही पेक्षा इन्फेक्शन खुप वाढले तर ऑक्सिजनसह वर दिलेले उपचार प्रकार… फुफुस काम कारायला खुप अशक्त झाले तर व्हेंटीलेटेर…

कोरोना विषयी सखोल माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.यात उपचार कसा व काय केला जातो हे लिहिले असले तरी यात औषध सांगितलेली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *