एक नारी भाजपा पे भारी !
दोन दिवस सोशल मीडिया गाजवणारी महिला समाजाने पाहिली . अनेक प्रतिक्रिया या भाजपच्या नारी वंदन गुंडाळायला लावणाऱ्या आहेत. या महिलेकडे “मेन स्ट्रिम ” मीडिया ने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले. पण तिला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद पाहून नाईलाज झाल्याने याला महिलेच्या “गेट आउट “ला जागा द्यावी लागली. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण आम्ही नेहेमी आमच्यासाठी कुणीतरी काही करावे व त्याची झळ आम्हाला बसू नये. या भेकड मानसिकतेचे गुलाम आहोत. जी कृती त्या महिलेने केली तोच अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. पण याचा वापर करायला घाबरवणारी व्यवस्था आपणच निर्माण केली आहे. यावर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. आपला अधिकार कुठे कधी आणि कसा वापरायचा हे या महिलेने समाजाला शिकवले आहे.
नारी वंदन एक दिशाभूल आहे .
2023 मध्ये दोन्ही सभागृहात महिला विषयाचे कोणते विधेयक बहुमताने पारित झाले होते याबाबत तुम्हाला काही सांगता येईल का ?
ही फेसबूक लिंक आहे ,ही कॉंग्रेस ने संसदेतील रेकॉर्डिंग आहे. ही माहितीच्या अधिकारात मागता येईल.
https://www.facebook.com/share/v/1D38DNv3cX/
नारी वंदन या विधेयकावर सत्ताधाऱ्यांचा जागृती मोर्चा !
या ट्विटर पोस्ट मध्ये तुम्ही बाहेरचे आवाज ऐका ,भाजपचे कार्यकर्ते नारीविषयीचे आपले विचार कसे व्यक्त करत आहे . ते जरा ऐका. हीच ती समाज निर्मिती सुरू आहे. नारी वंदन नाही तर याची आड घेऊन खासदारांची संख्या वाढविण्याचे विधेयक संमत करून घेण्यात अपयश आले ते झाकण्यासाठी नारी वंदन जागृती मोर्चाचा आधार घेतला जात आहे.
Get her out of here or she’ll get beaten up is THIS your version of 'Nari Shakti' ?
— Shraddha (슈라다) (@HuhVsWorld) April 22, 2026
Keep your 'Vandan' to yourselves. Your slogans are a joke.
pic.twitter.com/4NG5Vg9K51
अहंकारी नेते नारी वंदन कसे करणार ?
भाजपाच्या नारी वंदन जागृती मोर्चाने नगरिकान किती त्रास झाला याची कल्पना मंत्री गिरीश महाजन यांना नक्कीच नाही. सत्तेचा गैरवापर करून मोर्चाची परवानगी घेतली होती , त्यांनी पोलिसांत तक्रार करायला पाहिजे होती . असे सल्ले देण्यापेक्षा मुंबईकरांची माफी मागणे सोपे होते अस मला वाटत. एक महिलेने येऊन तुम्हाला ” गेट आऊट ” म्हणण रस्त्यावर असे कार्यक्रम घेऊ नका हे सांगूनही तुम्ही जागचे हलत नाही. हे पाहून त्या महिलेने आणखी कोणती आणि कशी प्रतिक्रिया नोंदविणे अपेक्षित होते. तुम्ही सुचवलेले दोन्ही पर्याय तुमची सत्ता गेल्यावर अमलात आणून दाखवा . आता जग खूप जवळ आल आहे. आणि ai तुमची सर्व कृती साठवून ठेवणार आहे. त्यामुळे तुमची या महिलेने केलेली कान टोंचणी ही जगाचा अंत होई पर्यन्त राहणार आहे.
Instead of apologising to that woman and the common people of Mumbai, BJP leader Girish Mahajan is blaming her.
— Saral Patel (@SaralPatel) April 22, 2026
“Road block to hoga, takleef to hogi.”
What a shameless party the BJP is — blaming citizens for showing their genuine anger after being inconvenienced by their drama… pic.twitter.com/dKcxKAPnpE
या प्रकरणाने स्वर्गीय विलासराव देशमुखांची आठवण झाली.
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रथी महारथी येतात. एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख हे साई समाधीचे दर्शन घेणीसाठी शिर्डीत आले. मुख्यमंत्री असल्या कारणाने संस्थान व्यवस्थेने “प्रोटोकॉल ” म्हणून दर्शन रांग थांबविली. आणि देशमुख पंधरा वीस मिनिट उशिराने समाधी मंदिरात पोहचले. त्यांनी समाधी मंदिराच्या भक्त बाहेर पडतात त्या दरवाजात पाय ठेवला आणि समोरून अचानक एक मुंबईकर महिला भक्त पुढे आली आणि तिने देशमुखांचे पाय धरले. कुणाला काही कळण्याच्या आत ती महिला उठून उभी राहिली आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना म्हणाली तुम्ही साईबाबापेक्षा मोठे आहात म्हणूनच तर तुमच्यासाठी भाविकांचे दर्शन रांग थांबवली आहे . विशेष म्हणजे विलासराव देशमुख दर्शन न घेता आल्या पावली परतले बाहेर येऊन कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरले.
स्व. विलासराव देशमुख हे साई भक्त होते अनेक वेळा परिवारासह ,मित्रासह ,एकटे दर्शनाला येत पण त्या घटने नंतर त्यांनी भाविकांना अडथळा होईल असे दर्शन कधीच घेतले नाही.
नाहीतर हे मंत्री गिरीश महाजन त्या महिलेवर पाण्याची बाटल फेकली ,असंसदीय भाषेत बोलली असे फुटकळ आरोप करून आपण कसे बरोबर आहोत हे सांगण्यात आपली ऊर्जा वाया घालत आहे. अहो या प्रकरणात जनमानसात तुमच्याविषयी आदर शिल्लक आहे याचा आढावा घ्या. सामान्य जनतेला आपल्या अधिकाराची जाणीव झाली तर काय होईल याची कल्पना करणेही भीतीदायक आहे.
