Credit :MandarCredit :Mandar

वीज वितरण वर १०० कोटींचा दावा ठोकणार…

कोपरगाव येथील कोपरगाव शहर व टाकळी शिवारात वीज तारांमुळे लागणा-या आगीत बागायती शेतीमाल व फळबागांचा मोठे नुकसान होत आहे.या बाबतीत उपाययोजना म्हणून कोपरगाव सब स्टेशन पासून रवंदा सबस्टेशनला जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीचा कंडक्टर बदलून नवीन टाकणेबाबत अथवा सदरची मुख्य विद्युत वाहिनी कुंभारी गाव मार्गे किंवा अन्य मार्गे कायम स्वरूपी स्थलांतरित कराव्यात. अन्यथा वीजतारामुळे आगीत बागायती शेतीचे संभाव्य नुकसान भरपाईसाठी वीज वितरण वर १०० कोटींचा दावा ठोकणार असून संभव्य नुकसान भरपाई संबंधित अधिकारी यांचे पगारातून,पेन्शन संपत्ती मधुन वसुल करणार असल्याचे कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. शंकरराव आढाव यांनी सांगितले.

याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म. (संगमनेर विभाग) चे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य,कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अनिकेत निरभवणे यांना तसे लेखी पत्र देवून कळवले आहे.

वीजतारामुळे आगीत बागायती शेतीचे नुकसान

    याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोपरगाव शिवारातील स.नं. १५८ व १५९ मध्ये आढावकुटुंबाचा १७ एकर पेरू व ४ एकर चिकू बाग आहे. असा मिळून एकूण २१ एकर फळबाग आहे. सदरचा फळबाग २५ वर्षे पूर्वीचा जुना आहे. सदर बागेत सेन्द्रीय पध्दतीने फळझाडांची जोपासना केली आहे. त्यासाठी बागेत जमिनीवर सेन्द्रीय खत म्हणून दर वर्षी १५० टन ऊंसाचे पाचट पसरविले जाते. त्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात गांडूळ तयार झालेले आहेत.

कोपरगाव सबस्टेशन पासून रवंदे धामोरी सबस्टेशनला जाणारी मुख्य विद्युत वाहिनी आढाव कुटुंबाच्या क्षेत्र स. नं. १५८ व १५९ या जमिनीमधून गेलेली आहे. सदरच्या मुख्य वाहिनीचे काम होऊन बरीच वर्षे झालेली आहेत, त्या वाहिनीचे कंडक्टर अतिशय जुने झालेले आहेत. त्यामुळे मुख्य वाहिनीच्या कंडक्टरच्या तारा तुटतात. त्या तारा जुन्या झाल्यामुळे सतत स्पार्किंग होत राहते. याबाबत दि.११ एप्रिल २०२२ रोजी आढाव यांनी पत्र देऊन लेखी सुध्दा कळविलेले आहे. परंतु वीज वितरण कडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे त्या मुख्य वाहिनीची एक तार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी श्री. भास्कर खंडीझोड या शेतकऱ्याच्या तोडणीस आलेल्या उभ्या ऊंसाचे पिकात तुटून पडली व त्यामुळे भास्कर खंडीझोड या शेतकऱ्याचा ३ एकर ऊसाचे पिकाला आग लागली व त्यांचा तोडणीस आलेला 3 एकर ऊंस आगीत जळून खाक झाला. तसेच त्या आगीमुळे भास्कर खंडीझोड यांचे शेजारचे शेतकरी कैलास जाधव यांचे २ एकर तोडणीस आलेला ऊस पिकाला सुध्दा आग लागून २ एकर ऊस आगीत जळून खाक झाला आहे. अशा तऱ्हेने आपल्या निष्काळजीपणामुळे सदर शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे.

वरील प्रमाणे दुर्दैवी घटना होऊनही सुमारे तीन महिन्यांचा कालावधी होऊनही वीजवितरण अधिकारी यांनी सदर मुख्य वाहिनीचे कंडक्टर बदलण्याकामी कोणतीही दखल घेऊन कारवाई केलेली नसल्याने परिसरातील शेतकरी सतत तुटणा-या तारांमुळे भयभीत झाला असून यातून जिवित हानी संभवत असल्याचे वीज वितरण विभागास निदर्शनास आणून दिले आहे.

संभव्य नुकसान भरपाई संबंधित अधिकारी यांचे पगारातून,पेन्शन संपत्ती मधुन वसुल करणार…

आढाव यांचे जमिनीतून गेलेल्या वीज तारांच्या स्पार्किंगमुळे दि. १ एप्रिल २०२३ रोजी चिकूच्या बागेला आग लागली व 25 वर्षे वयाची ६ चिकूची झाडे जळून खाक झाली. चिकूच्या झाडाचे आयुष्य हे किमान १०० वर्षे आहे. त्यामुळे आमचे सुमारे ६,५०,००,०००/ अक्षरी रू. सहा कोटी पन्नास लाख रूपयांचे नुकसान झालेले आहे. त्याबाबत नुकसान भरपाई मागणेचे व मिळणेचे आमचे हक्कास बाध न येता आढाव यांनी पत्रा द्वारे कळवित आहोत.

वीज वितरणने तातडीने सदर जुनी झालेल्या मुख्य विद्युत वाहिनीचा कंडक्टर बदलून त्या ठिकाणी नवीन कंडक्टर टाकावा. शंकरराव आढाव व शेतक-यांच्या मागणीकडे निगरगट्टपणे दुर्लक्ष केल्यास व भविष्यात दुर्दैवाने तेथील पेरू व चिकूच्या एकूण २१ एकर फळबागेला आग लागल्यास, संगमनेर, कोपरगाव येथील व्यक्तिशः अधिकारी व म. रा. वीज वितरण कं. म. यांना जबाबदार धरले जाईल व तुमचे कडून बागेची नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रूपये फक्त ची मागणी सक्षम न्यायालयात केली जाईल व ती रक्कम व्यक्तिशः तुमच्या सर्वांच्या पगारातून व पेन्शनमधून वैयक्तिक व संयुक्तरित्या सक्तीने वसूल केले जातील.

तसेच कोपरगाव नगर परिषदेने हद्दवाढ केलेली आहे. स.नं. १५९ पर्यन्तचा भाग कोपरगाव नगरपरिषद हद्दीत आला आहे. शहरांची वस्ती वाढत आहे. त्यामुळे कोपरगाव ते रवंदे मुख्य विद्युत वाहिनी गावामधून जाणे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे आग लागल्यास व लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका पोहचून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरची मुख्य विद्युत वाहिनी दुसरीकडून कुंभारी मार्गे अगर योग्य त्या अन्य मार्गे स्थलांतरित करण्यात यावी. अन्यथा नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रूपये फक्त ची मागणी सक्षम न्यायालयात केली जाईल. असा इशारा कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. शंकरराव आढाव व परिसरातील शेतकरीवर्ग यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *